मुंबई, 17 डिसेंबर : एक विशाल अजगरचा व्हिडीओ (Viral Video) पाहून लोकही हैराण झाले आहे. या व्हिडीओमध्ये एका भल्यामोठ्या अजगराने एका व्यक्तीला वेटोळं घातलं आहे. हा धक्कादायक व्हिडीओ 16 डिसेंबर रोजी शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, एक व्यक्ती या भल्यामोठ्या अजगरापासून स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे.
या अजगराने तरुणाच्या पायाला वेटोळं घातलं आहे. काहीजण अजगराला काढण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र अजगराची पकड इतकी जबरदस्त आहे की व्यक्तीला सोडवणं अवघड झालं आहे.
In the video, the man can be seen trying to escape from the snake coiling around his legs as other people approach him to help. A scary video of a man struggling for his life as a giant snake coils itself around his legs #16December#wednesdaythoughtpic.twitter.com/0jV6V0NDdy
या 29 सेकंदाच्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक विशालकाय अजगराने व्यक्तीच्या पायाला अत्यंत वाईट प्रकारे वेटोळं घातलं आहे. व्यक्ती अजगरापासून मुक्ती मिळविण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहे. यामध्ये त्याला अनेकजण मदतही करीत आहेत. मात्र अजगराच्या समोर व्यक्ती असहाय्य दिसत आहे. मात्र हा व्हिडीओ अशावेळी संपतो, ज्यामुळे व्यक्तीची अजगराच्या तावडीतून सुटका झाली की नाही हे समजू शकले नाही.