• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • तरुणाने अचानक उड्डाण पुलावरुन उडी घेतली अन्...; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

तरुणाने अचानक उड्डाण पुलावरुन उडी घेतली अन्...; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

व्हिडिओमध्ये एक युवक जबरदस्त स्टंट करताना दिसतो. मात्र पुढच्याच क्षणी असं काही पाहायला मिळतं की तुमचा डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

 • Share this:
  नवी दिल्ली 19 नोव्हेंबर : प्रसिद्धी मिळवण्यासाठी आजकाल लोक कोणत्याही थराला जायला तयार असतात. अनेकदा तर लोक आपला जीवही धोक्यात टाकतात. सोशल मीडियावर (Social Media) स्टंटचे अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Videos of Stunt) होत असतात. यातील अनेक व्हिडिओ हैराण करणारे असतात, जे पाहूनच धडकी भरते. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक युवक जबरदस्त स्टंट करताना दिसतो. मात्र पुढच्याच क्षणी असं काही पाहायला मिळतं की तुमचा डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कशाप्रकारे हा व्यक्ती आपल्या जीवाची पर्वा न करता स्टंट करतो. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर हा व्हिडिओ (Twitter Video) ‘into_the_fairies_world’ नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे.
  व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक तरुण रसत्यावरुन धावत रोडच्या दुसऱ्या बाजूला उडी घेतो. हैराण करणारी बाब म्हणजे या उड्डाण पुलावरुन उडी घेत हा व्यक्ती अगदी सहजपणे समोरच्या इमारतीवर पोहोचतो. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही हैराण झाले. सोबतच लोक यावर निरनिराळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. लोक हा व्हिडिओ एकमेकांसोबत शेअर करण्याबरोबरच यावर प्रतिक्रिया देत या तरुणाला सल्लेही देत आहेत. मात्र, व्हिडिओ नेटकऱ्यांची भलतीच पसंती मिळत असून अनेकांनी या तरुणाच्या टायमिंगचं आणि जबरदस्त स्टंटचं कौतुकही केलं आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: