नवी दिल्ली 22 नोव्हेंबर : इंटरनेटवर सध्या एक स्टंटचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Viral Video) होत आहे. हा स्टंट एखादी अनुभवी व्यक्ती नाही तर अतिशय लहान मुलगी करत आहे (Stunt Video of Little Girl). काही सोशल मीडिया यूजर्सनी हा व्हिडिओ फेक (Fake Video) असल्याचं म्हटल्यामुळे वादविवादही सुरू झाला आहे. हा व्हिडिओ खरंच हैराण करणारा आहे. कारण व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीनं एक चिमुकली रँपवर फ्लिक करताना दिसते ते पाहून डोळ्यांवर विश्वास बसत नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. आतापर्यंत ५ मिलियनहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.
आजकाल तरुणांमध्ये स्टंटचं प्रमाण चांगलंच वाढलं आहे. अनेकदा तर हे लोक असं काही करतात जे पाहूनच अंगावर काटा येतो. सध्या सोशल मीडियावर असाच काहीसा व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून सगळेच हैराण झाले आहेत. काही यूजर्सनी हा व्हिडिओ फेक असल्याचंही म्हटलं आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक लहान मुलगी चार चाकाच्या छोट्या बाईकवर स्टंट करत आहे. व्हिडिओमध्ये एक रँप दिसतो. यावरुन ही चिमुकली बाईकसह फ्लिप मारते. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही नक्कीच हैराण झाला असाल. अनेकांचं असं म्हणणं आहे की या बाईकवर लहान मुलगी नसून डॉल बसवली गेली आहे.
View this post on Instagram
हा स्टंट व्हिडिओ इन्स्टाग्रामवर selmamordovskaya नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. यूजरनं कॅप्शन देत लिहिलं, ‘Real की Fake…हे समजून घेण्यासाठी मला हा व्हिडिओ पाच वेळा पाहावा लागला. हा व्हिडिओ ३ ऑक्टोबरला अपलोड केला गेला आहे. आतापर्यंत ५ मिलियनहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अनेकांचं असं म्हणणं आहे की यातील बाईक रिमोट कंट्रोलच्या मदतीने ऑपरेट केली गेली आहे. तसंच यावर लहान मुलगी नसून डॉलला बसवलं गेलं आहे.
काही यूजर्सनी मात्र या चिमुकलीसाठी चिंता व्यक्त केली आहे. लोक कमेंट सेक्शनमध्ये या चिमुकलीबद्दल विचारत आहेत. सोबतच तिला दुखापत झाली का, अशी चौकशीही करत आहेत. मात्र हा व्हिडिओ वारंवार पाहिल्यावर तुम्हालाही समजेल की बाईकवर कोणीही मुलगी नाही तर एक डॉल आहे. या जागी खरंच लहान मुलगी असती तर तिला दुखापत झाली असती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.