मराठी बातम्या /बातम्या /Viral /मासे कापताच महिलेला दिसली अशी गोष्ट; ऐकून तुम्हाला ही बसेल धक्का

मासे कापताच महिलेला दिसली अशी गोष्ट; ऐकून तुम्हाला ही बसेल धक्का

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

मासे घरी आणल्यानंतर त्याला कापायला सुरुवात केली. त्यांना काहीतरी वेगळं जाणवल्यानंतर, त्यांनी त्याचा एक तुकडा प्रयोगशाळेत चाचणीसाठी ठेवला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 29 जानेवारी : बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की मासे हे आरोग्यासाठी आणि शरीरासाठी चांगले असतात. त्याचे अनेक फायदे आपल्याला आहेत. महाराष्ट्रातील कोकण आणि मालवण भागाता तर आवडीने मासे खाल्ले जातात. पण केरळमधून एक अशी घटना समोर आली आहे, ज्याबद्दल ऐकल्यानंतर कदाचित तुम्ही मासे खाण्यापूर्वी दोनदा विचार कराल.

खरंतर येथे एका महिलेने स्थानिक बाजारातून मासे विकत घेतले, मात्र तो मासा कापाताना तिला त्यात असं काही आढळून आलं की त्यामुळे आता चिंता वाढली आहे.

हे ही पाहा : डोंगराळ भागात अचानक हवेत उडू लागली बस, Video पाहून तुम्हीही चक्रावाल

ऑन्कोपॅथॉलॉजीमध्ये पारंगत असलेल्या कोझिकोड येथील ज्येष्ठ पॅथॉलॉजिस्ट डॉ. नीना मॅम्पिली यांनी त्यांच्या घराजवळील बाजारातून मासे विकत घेतले.

त्यांनी मासे घरी आणल्यानंतर त्याला कापायला सुरुवात केली. त्यांना काहीतरी वेगळं जाणवल्यानंतर, त्यांनी त्याचा एक तुकडा प्रयोगशाळेत चाचणीसाठी ठेवला. या परीक्षेचा निकाल अतिशय चिंताजनक होता.

मासे कापताना नीना यांनी पाहिले की ती ज्या माशांना शिजवून त्या त्यांच्या कुटुंबियांना खायला देणार होत्या त्यात फॉर्मेलिन आहे.

हे रसायन अन्नपदार्थ साठवण्यासाठी उपयुक्त आहे. हे रसायन प्रामुख्याने शवागार आणि वैज्ञानिक प्रयोगशाळेत आढळते. पण हे असं रसायन आहे ज्याला भारतीय अन्न सुरक्षा आणि मानकांनी ब्लॅक लिस्ट केलं आहे.

आता हे खाण्याचे तोटो काय असतात, असा प्रश्न उपस्थीत होतो.

अन्नामध्ये जास्त प्रमाणात फॉर्मल्डिहाइडच्या उपस्थितीमुळे ओटीपोटात दुखणे, उलट्या होणे, कोमा, किडनीला दुखापत आणि मृत्यू देखील होऊ शकतो.

एका अहवालात असे म्हटले आहे की डब्ल्यूएचओची इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (IARC) फॉर्मल्डिहाइडचे वर्गीकरण "मानवांसाठी कार्सिनोजेनिक" म्हणून करते, ज्यात पुरेशा पुराव्यासह मानवांमध्ये नासोफरीन्जियल कर्करोग होतो.

एकदा संशयाची पुष्टी झाल्यावर, डॉ. नीना यांनी त्यांचे निष्कर्ष इतर वैद्यकीय व्यावसायिकांसोबत शेअर केले. द न्यू इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार, त्यांनी टेस्ट ट्यूबच्या आत काढलेल्या जांभळ्या द्रावणासह चाचणी केलेल्या माशांचे छायाचित्र डॉक्टरांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये शेअर केले. हे पाहून त्याच्या सहकाऱ्यांना धक्काच बसला आणि त्याने या प्रकरणाचे गांभीर्य समजून इतरांनाही शेअर केले त्यामुळे केरळमध्ये तर या फोटोने खळबळ उडवून दिली आहे.

First published:

Tags: Fish, Shocking, Shocking news, Social media, Top trending, Viral