मराठी बातम्या /बातम्या /Viral /

शारिरीक संबंध ठेवताना 67 वर्षीय वृद्धाचा मृत्यू; कारण फारच धक्कादायक

शारिरीक संबंध ठेवताना 67 वर्षीय वृद्धाचा मृत्यू; कारण फारच धक्कादायक

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

या प्रकरणात अशी माहिती समोर आली आहे. जे ऐकून तुम्हाला विश्वास ठेवणं देखील कठीण जाईल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई २४ नोव्हेंबर : बंगळुरूच्या जेपी नगरमध्ये १७ नोव्हेंबर रोजी प्लास्टिकच्या पिशवीत एका ६७ वर्षीय व्यक्तीचं शरीर सापडलं, ज्यानंतर हे प्रकरण देशभरात चर्चेत आलं. हे कोणी आणि का केलं या सगळ्याचा पोलीस शोध घेत असताना, त्यांच्यासमोर धक्कादायक गोष्ट आली.

या प्रकरणात ही माहिती फारच महत्वाची आहे. ज्यामध्ये असे सांगितले जात आहे की, या व्यक्तीची गर्लफ्रेंड होती आणि लैंगिक संबंधांदरम्यान अपस्माराच्या अटॅकमुळे (epileptic attack) त्याचा मृत्यू झाला. ज्यानंतर घाबरलेल्या त्याच्या गर्लफ्रेंड आणि कुटुंबीयांनी या वृद्ध व्यक्तीचे शरीर प्लास्टीकमध्ये गुंडाळून लांब फेकून दिलं होतं.

हे ही वाचा : महिलांनी 'या' गोष्टी Gynecologist पासून लपवणं ठरु शकतं धोक्याचं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 67 वर्षीय वृद्ध हा एक बिझनेस मॅन आहे आणि त्याचे 35 वर्षीय महिलेसोबत प्रेमसंबंध होते. घटनेच्या दिवशी, म्हणजेच 16 नोव्हेंबर रोजी वृद्ध व्यक्ती आणि ही महिला शारिरीक संबंधासाठी जवळ आहे, पण यादरम्यानच त्याचा पलंगाव मृत्यू झाला.

समाजात बदनामी होण्याच्या भीतीने या महिलेनं आपल्या भावाला आणि पतीला मदतीसाठी बोलावले आणि नंतर या वृद्ध बिझनेसमॅनचा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत भरून जेपी नगरमधील एका निर्जन ठिकाणी फेकून दिला.

पण अज्ञात बॉडी पोलिसांना सापडल्यामुळे त्यांनी याचा तपास सुरु केला आणि या वृद्ध व्यक्तीच्या हत्येचं गुढं अखेर उलघडलं.

First published:

Tags: Shocking news, Social media, Viral, Viral news