मुंबई, 05 फेब्रुवारी : कोणताही सण असोत किंवा मग कार्यक्रम लोक आपलं घर लाईट्स आणि शोभेच्या वस्तुंनी सजवतात. त्यासाठी लोक झुंबर, फुगे, दिवे, पताके लावतात. पण एका व्यक्तीने आपलं घर अशावस्तुने सजवलंय, ज्याबद्दल जाणून तुम्हाला आश्चर्य नक्कीच वाटेल. हो, कारण या व्यक्तीने चक्क ग्रेनेड बॉम्बने आपलं घर सजवलं आहे. हे पाहून त्याच्या घरी आलेल्या पाहूण्यांनी देखील पळ काढला.
वास्तविक, ही घटना यूकेच्या कॉर्नवॉलमधील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, येथील एका वेड्या व्यक्तीने हे कृत्य केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्या व्यक्तीने बाजारातून काही ग्रेनेड्स विकत घेतले आणि त्याची घरी सजावट केली. विशेष म्हणजे हे सर्व ग्रेनेड जिवंत म्हणजेच खरे आहेत. ज्यामुळे कधीही स्फोट होऊ शकतो.
हे ही पाहा : लोकांना मारुन ऍसिडमध्ये वितळवायचा, अखेर 16 वर्षानंतर पोलिसांकडून खेळ खल्लास
या व्यक्तीने आपल्या घराच्या भिंतीवर, अंगणात आणि छतावर एक एक सेट ग्रेनेडचा लावला. त्याला हे कृत्य करताना पाहून शेजाऱ्यांना धक्काच बसला, पण त्यांना वाटलं की कदाचित ते खोटे असावे, म्हणून त्यांनी जवळ जाऊन पाहण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मात्र त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्यानंतर क्षणाचाही विलंब न करता लोकांनी तेथून पळ काढला.
योगायोगाने त्याचवेळी पोलिसांचे पथक परिसरात गस्त घालत होते. एका शेजाऱ्याने जाऊन हा सर्व प्रकार पोलिस पथकाला सांगितला. पोलिसांचे पथक जेव्हा त्या व्यक्तीच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर घाई करत बॉम्बशोधक पथकाला पाचारण करून सर्व जिवंत ग्रेनेड बॉम्ब नष्ट करण्यात आले.
त्या व्यक्तीला जेव्हा याबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्यांने पोलिसांना सांगितले की, त्याला खोटो ग्रेनेट पाहिजे होते, हे ग्रेनेड खरे आहेत, हे मला माहित नव्हते. या व्यक्तीलाही याबद्दल जाणून धक्का बसला. पण आता या तरुणाच्या बोलण्यात किती तथ्य आहे. याबद्दल पोलीस तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking, Social media, Social media trends, Top trending, Viral