मुंबई 29 जानेवारी : कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला भेटण्यासाठी, त्यांचे सांत्वन करण्यासाठी तसेच मेलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून अनेक लोक त्याच्या अंतिम यात्रेत जातात. याप्रसंगी कुटुंबातील लोकांना नक्कीच आपला जवळचा व्यक्ती गमावल्यामुळे दु:ख होतं.
पण विचार करा की जर तुम्हाला एखाद्याच्या मृत्यीची बातमी मिळाली आणि त्या व्यक्तीच्या अंत्य यात्रेत सहाभागी होण्यासाठी तुम्ही गेलात आणि ती व्यक्ती तुम्हाला स्वत:च्या पायावर उभी राहिलेली आणि जिवंत दिसली तर?
सहाजिकच तुम्हाला आनंद होईल, पण धक्का देखील नक्कीच बसेल की एक मेलेली व्यक्ती कशी जीवंत होऊ शकते? असंच एक प्रकरण परदेशातून समोर आलं आहे. हे संपूर्ण प्रकरण ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.
हे ही पाहा : रस्त्यावर भिक मागणाऱ्या महिलेचं असं सत्य समोर, पाहून पोलिसही चक्रावले
वास्तविक, ही घटना ब्राझीलमधील एका शहरातील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या व्यक्तीचे नाव बाल्टजार लेमोस आहे. या व्यक्तीने त्याच्या मृत्यूचे खोटे नाटक रचले आणि त्याने आधी त्याच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवली, नंतर त्याची बनावट अंत्य यात्राही काढली. एवढेच नाही तर त्यांच्या अंत्य यात्रेत सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने लोक तेथे पोहोचले.
पण स्मशानात पोहोचल्यावर जेव्हा लोकांनी त्या व्यक्तीला जिवंत पाहिले, तेव्हा त्यांना धक्का बसला.
या व्यक्तीने जेव्हा या प्रकाराचं सत्य लोकांना सांगितलं, तेव्हा लोकांना धक्काच बसला. या व्यक्तीनं सांगितलं की, त्याला हे जाणून घ्यायचं होतं की त्याच्या अंत्य यात्रेत किती लोक सहभागी होतील आणि इतक्या लोकांना आलेलं पाहून मला खूप बरं वाटलं, असं देखील ती व्यक्ती म्हणाली.
हे ही पाहा : 'चाकू' घेऊन मुलगी मॉलमध्ये शिरली आणि पुढच्या क्षणी.... व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
सध्या त्या व्यक्तीचे हे कृत्य ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. तसेच लोक सांतापले देखील आहेत. नुकतीच त्या व्यक्तीच्या मृत्यूची बातमी फेसबुकवर पसरली. पण सोशल मीडियावर देखील लोकांना या व्यक्तीचं सत्य कळालं तेव्हा लोकांनी त्या व्यक्तीला विचित्र शब्दात सुनवलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Social media, Social media trends, Top trending, Viral