मुंबई 29 जानेवारी : आपण कुठेही फिरायला गेलो तेथे आपल्या चौका-चौकात भिकारी दिसतात. त्यांच्याकडे राहायला घर नसतं, तर कधी खायला पैसे. त्यांची अशी अवस्था पाहून आपण त्यांना लगेच काही खायला देतो किंवा मग पैसे काढून देतो. पण अनेकदा या लोकांचे असे काही सत्य समोर आले आहेत. जे पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
अशीच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये एक भिकारी महिला करोडपती असल्याची घटना समोर आली आहे. या महिलेची कहाणी ऐकून तुम्ही चक्रावाल.
हे ही पाहा : मद्यधुंद महिलेनं घेतली सिंहाच्या पिंजऱ्यात उडी आणि मग...
ही घटना संयुक्त अरब अमिरातीची आहे. खलीज टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, येथील अबुधाबीमध्ये एक महिला रोज भीक मागायची. कधी ती या चौरस्त्यावर बसायची तर, कधी दुसऱ्या. एवढेच नाही तर शहरातील अनेक मशिदींसमोर बसून ती भीक मागायची. दरम्यान, एका व्यक्तीला या महिलेला आलिशान कारमध्ये बसलेले पाहिल्याचा संशय आला. त्या व्यक्तीने याबाबत पोलिसांना माहिती दिली.
यानंतर पोलिसांच्या पथकाने महिलेवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. अखेर पोलिसांचा संशय खरा ठरला. पोलिसांनी या महिलेचा पाठलाग केला असता त्यांना लक्षात आले की या महिलेकडे एक महागडी आलिशान कार आहे. ही कार अत्याधुनिक लक्झरी मॉडेलपैकी एक आहे. भीक मागण्यासाठी तिला दूरवर जावं लागलं की ती याच गाडीतून जात असे. बाकी वेळ ही गाडी तिथेच उभी असायची. महिलेचा स्वतःचा बंगलाही आहे.
हे ही पाहा : करायला गेला एक आणि घडलं भलतंच, लहान मुलाचा Video पाहून थांबणार नाही हसू
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता या महिलेकडून कोट्यवधी रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली. याशिवाय ही महिला रोज नवे कपडे परिधान करून येत असे, मात्र भीक मागण्यासाठी ती घाणेरडे कपडे परिधान करत असे, असेही तपासात निष्पन्न झाले आहे. सध्या पोलिसांनी महिलेची सर्व रक्कम जप्त केली असून तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money, Police, Shocking news, Social media, Top trending, Viral