मराठी बातम्या /बातम्या /Viral /देव तारी त्याला कोण मारी! अचानक चालत्या ट्रकखाली आली दुचाकी, घटनेचा थरार CCTV मध्ये कैद

देव तारी त्याला कोण मारी! अचानक चालत्या ट्रकखाली आली दुचाकी, घटनेचा थरार CCTV मध्ये कैद

या घटनेमध्ये भरधाव वेगात असलेल्या दुचाकीवरील दोन युवक एका चालत्या ट्रकखाली आले. मात्र, या भीषण अपघातातून ते दोघंही बचावले. या घटनेचा थरारक व्हिडिओ (Video of Road Accident) समोर आला आहे.

कोलकाता 01 जून : देव तारी त्याला कोण मारी, हे वाक्य अनेकदा आपल्या कानावर पडतं. बऱ्याचदा आपल्याला प्रत्यक्षात या गोष्टीचा प्रत्ययदेखील येतो. अगदी मृत्यूच्या दारातून बाहेर येणारी काही लोकंही आपण बघतो. या घटना थक्क करणाऱ्या असतात. अशीच आणखी एक घटना सध्या समोर आली आहे. या घटनेमध्ये भरधाव वेगात असलेल्या दुचाकीवरील दोन युवक एका चालत्या ट्रकखाली आले. मात्र, या भीषण अपघातातून ते दोघंही बचावले. या घटनेचा थरारक व्हिडिओ (Video of Road Accident) समोर आला आहे.

ही घटना पश्चिम बंगालमधील (West Bengal) मुर्शिदाबाद जिल्ह्यातील आहे. जिल्ह्यातील बडवा भागात सोमवारी ही घटना घडली आहे. एक ट्रक रस्त्यावरुन जात असतानाच बाजूने एक भरधाव वेगात दुचाकी येते आणि या दुचाकीवरील दोन्ही युवक घसरत ट्रकच्या खाली येतात. यादरम्यान ट्रक चालकानं जोरात ब्रेक मारला. यानंतर आसपास असणारे लोक धावत याठिकाणी जमा झाले. यावेळी त्यांनी पाहिलं की दोन्ही युवक अगदी सुरक्षित होते. इतकंच नाही तर ते स्वतः ट्रकच्या खालून सरकत बाहेर आले.

त्याच्या मोबाईल चोरीमुळे 3 महिन्याचे बाळ झाले पोरके, मुंबईतील मन हेलावून टाकणारी

ही थरकाप उडवणारी संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मृत्यूच्या दारातून परत आलेल्या या युवकांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसतं, की भरधाव वेगात असणारी ही दुचाकी डोळ्याची पापणी झाकण्याच्या आत चालत्या ट्रकखाली येते. मात्र, ट्रक चालकाच्या प्रसंगावधानामुळे या युवकांचा जीव वाचला आहे.

First published:
top videos

    Tags: Accident, Cctv footage, Shocking video viral