मराठी बातम्या /बातम्या /Viral /दुष्ट आत्म्याचा भयंकर तांडव कॅमेऱ्यात कैद, Video पाहून अंगावर येईल काटा

दुष्ट आत्म्याचा भयंकर तांडव कॅमेऱ्यात कैद, Video पाहून अंगावर येईल काटा

व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओ व्हायरल

एका खोलीत घरातील महिला बाळाला घेऊन उभी असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. दुसरीकडे, धर्मगुरू आध्यात्मिक शक्तीच्या मदतीने दुष्ट आत्म्याला बेघर करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 06 फेब्रुवारी : सोशल मीडियावर एक अतिशय भयानक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो तुम्हाला आधी यामध्ये काय सुरु आहे हेच समजणार नाही. या व्हिडीओमध्ये एका घरामध्ये आत्मा असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओमधील दृश्य पाहून तुम्ही काही सेकंदासाठी थक्क व्हाल.

एका खोलीत घरातील महिला बाळाला घेऊन उभी असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. दुसरीकडे, धर्मगुरू आध्यात्मिक शक्तीच्या मदतीने दुष्ट आत्म्याला बेघर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. जेव्हा ही व्यक्ती मंत्रीत केलेलं पाणी घरात शिंपडण्याचा प्रयत्न करते तेव्हा, घरात हालचाल होऊ लागते आणि वस्तु अचानक जोरजोरात हलू लागतात.

हे ही पाहा : शिव मंदिरात घुसलेल्या चोरांनी आधी दागिने चोरले, पण दान पेटीला हात लावायला गेले आणि... व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

इतकच नाही तर तिथे जवळच असलेल्या महिलेचे केस देखील कोणीतरी हवेत धरले असल्याचे दिसत आहे. व्हिडीओत पुढे घरातील फोटो तसेच इतर वस्तु हवेत उडताना आणि हलताना दिसत आहेत.

धर्मगुरू या सैतानाला घर सोडण्याचा सल्ला देतात. दुष्ट आत्म्याला वाटते की तो अधिक शक्तिशाली आहे. त्याला कोणीही घरातून हाकलून देऊ शकत नाही. मग धर्मगुरू मंत्रोच्चार करून प्रथम पाण्यात फुंकतात. यानंतर ते घरात पाणी शिंपडण्यास सुरुवात करतात.

अनेक प्रयत्नानंतर मग अखेर या घरातील सैतान किंवा आत्माला हार मानून तेथून पळ काढावा लागतो.

व्हिडीओतील हे धर्मगुरू हे महिलेचे वडील असल्याचे व्हिडिओत सांगितले गेले आहे. हा व्हिडीओ Mysteries Of The Unexplained या ट्वीटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आले आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरुन कमेंट्स केले आहेत. काही लोका हा व्हिडीओ पाहून घाबरले आहेत. तर काहींचं असं म्हणणं आहे की हा खोटा व्हिडीओ आहे. या लोकांनी मजा म्हणून तो तयार केला गेला आहे.

हा व्हिडीओ कुठला आणि कधी काढला गेला आहे. तसेच तो कितपत खरा आहे, हे सांगता येणं कठीण आहे. पण तुम्ही मनोरंजन म्हणून या व्हिडीओकडे पाहू शकता आणि तो पाहण्याचा आनंद घेऊ शकता.

First published:

Tags: Shocking video viral, Social media, Top trending, Videos viral, Viral