मराठी बातम्या /बातम्या /Viral /तरस आणि सिंहाच्या जबरदस्त लढाईचा अनपेक्षित शेवट; पाहा कोण ठरलं विजयी, Shocking Video

तरस आणि सिंहाच्या जबरदस्त लढाईचा अनपेक्षित शेवट; पाहा कोण ठरलं विजयी, Shocking Video

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की सिंहानी तरसाला आपल्या शक्तीशाली जबड्यात पकडलं आहे. मात्र, तरसही हार मानायला तयार नाही. तोदेखील सिंहासोबत लढा देऊ लागतो.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की सिंहानी तरसाला आपल्या शक्तीशाली जबड्यात पकडलं आहे. मात्र, तरसही हार मानायला तयार नाही. तोदेखील सिंहासोबत लढा देऊ लागतो.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की सिंहानी तरसाला आपल्या शक्तीशाली जबड्यात पकडलं आहे. मात्र, तरसही हार मानायला तयार नाही. तोदेखील सिंहासोबत लढा देऊ लागतो.

नवी दिल्ली 01 नोव्हेंबर : म्हटलं जातं की जंगलातील नियम वेगळे असतात. इथे जो शक्तीशाली आहे तो राज्य करू शकतो. याच कारणामुळे सिंहाला जंगलाचा राजा म्हटलं जातं. अन्यथा जंगलात सिंहाशिवायही अनेक भयंकर शिकारी प्राणी असतात. तरसदेखील त्यातीलच एक आहे. आपली शिकार समोर दिसताच हा प्राणी त्याच्यावर हल्ला करतो आणि खाऊन टाकतो. कधी कधी तर तरस सिंहावरही भारी पडतो. मात्र, अखेर सिंह सिंहच असतो. त्याच्या तावडीत जर कोणी सापडलं तर त्याचा शेवट जवळपास निश्चितच असतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral on Social Media) होत आहे. यात दिसतं की एक तरस सिंहासोहत पंगा घेतो (Hyena and Lion Fight). अखेर यात कोणाचा विजय होतो, हे जाणून घेऊया.

लग्नमंडपातच चढला नवरीचा पारा; पाहताच घाबरून नवरदेवानं केलं असं काही की.., VIDEO

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की सिंहानी तरसाला आपल्या शक्तीशाली जबड्यात पकडलं आहे. मात्र, तरसही हार मानायला तयार नाही. तोदेखील सिंहासोबत लढा देऊ लागतो. यादरम्यान तो सिंहावरच सरस ठरताना दिसतो, मात्र सिंह तर सिंह आहे. तो तरसाला पुन्हा आपल्या जाळ्यात ओढतो. दोन मिनिटाच्या या संघर्षानंतर अखेर हायना स्वतःला सिंहाची शिकार बनण्पासून वाचवतो.

2 मिनिट 26 सेकंदाचा हा व्हिडिओ फेसबुकवर अफ्रीकन बुश किंगडमने आपल्या पेजवरुन शेअऱ केला आहे. यूजरनं कॅप्शनमध्ये लिहिलं, सिंह आणि तरस एकमेकांना कट्टर दुश्मन आहेत. पाहा कशा पद्धतीनं तरस या शक्तीशाली सिंहाच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतो.

नवरीला हरवण्यासाठी नवरदेवानं केले आटोकाट प्रयत्न; तरीही मानावी लागली हार, Video

व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, जंगलात हाच नियम आहे. इथे कोण कोणावर सरस ठरेल हे सांगता येत नाही. तर दुसऱ्या यूजरनं लिहिलं, दोन्हीही ताकतवार प्राणी आहेत. त्यामुळे या लढाईत कोणालाही गंभीर दुखापत झाल्याचं दिसत नाही. आणखी एकानं लिहिलं, की तरसामध्ये कमालीची एनर्जी आहे. यामुळेच तो सिंहापुढे इतका वेळ टिकू शकला.

First published:

Tags: Shocking video viral, Wild animal