मराठी बातम्या /बातम्या /Viral /

जीव वाचवण्यासाठी सरड्याची धडपड; थेट सापासोबतच भिडला अन्...., पाहा कोणी जिंकली लढाई, VIDEO

जीव वाचवण्यासाठी सरड्याची धडपड; थेट सापासोबतच भिडला अन्...., पाहा कोणी जिंकली लढाई, VIDEO

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की दोन सरडे भिंतीवर फिरत आहेत. मात्र इतक्यात छतावरुन एक लांब घातक साप सरड्याजवळ येतो आणि त्याला जबड्यात पकडतो

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 28 नोव्हेंबर : तुम्ही दोन सापांची किंवा साप आणि मुंगसाची भांडणं अनेकदा पाहिली असेल. मात्र तुम्ही कधी सरडा आणि साप यांच्यात जीवन-मरणाची लढाई पाहिली आहे का? जर तुम्ही याआधी असं दृश्य पाहिलं नसेल तर आज नक्की पाहा. सोशल मीडियावर सध्या एक असा व्हिडिओ (Viral Video on Social Media) समोर आला आहे. ज्यात सापाने एका सरड्यावर हल्ला केल्याचं पाहायला मिळतं. यानंतर आपला जीव वाचवण्यासाठी सरडा सापासोबतच भिडला (Lizard and Snake Fight) .

व्हिडिओमधील साप सरड्याला सोपी शिकार समजून बसला. मात्र सरडा अतिशय चपळ निघाला आणि त्यानं सापाचीच अशी अवस्था केली त्याला स्वतःचा जीव वाचवणंही अवघड गेलं. लढाईचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की दोन सरडे भिंतीवर फिरत आहेत. मात्र इतक्यात छतावरुन एक लांब घातक साप सरड्याजवळ येतो आणि त्याला जबड्यात पकडतो. हा साप सरड्याला गिळणारच असतो इतक्यात दुसरा सरडा त्याच्यावर हल्ला करते. अखेर या सापाला सरड्याला सोडून द्यावं लागतं. हैराण करणारी बाब म्हणजे साप आणि सरड्याची ही लढाई भिंतीवरच झाली. अखेर सापाने तिथून पळ काढला.

सापाचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे. अनेकांनी हा व्हिडिओ लाईक केला असून अनेकांनी यावर निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत. सोशल मीडिया यूजर्सनी हा व्हिडिओ इतर प्लॅटफॉर्मवरही शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर royal_pythons नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

एका यूजरने यावर कमेंट करत लिहिलं, याला म्हणतात टीम वर्क. आपण एकत्र येऊन अगदी मोठ्या अडचणीचाही सहज सामना करू शकतो. तर, दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, सापालाही समजलं असेल की आज तो चुकीच्या हातात सापडला आहे. याशिवाय इतरही अनेकांनी यावर मजेशीर कमेंट केल्या आहेत.

First published:

Tags: Shocking video viral, Snake video