• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • धक्कादायक! दारू पार्टी करताना समोर आलेला साप तिघांनी भाजून खाल्ला; झाली भयंकर अवस्था

धक्कादायक! दारू पार्टी करताना समोर आलेला साप तिघांनी भाजून खाल्ला; झाली भयंकर अवस्था

दारू पार्टी करताना तीन मित्रांनी चक्क साप भाजून खाल्ला (Drunk Man ate a Roasted Snake). यानंतर यातील एकाची अवस्था इतकी वाईट झाली की तो अनेक तास बेशुद्ध राहिला.

 • Share this:
  नवी दिल्ली 20 नोव्हेंबर : दारू पिल्यानंतर स्वतःवर नियंत्रण न राहिल्यानं अनेक घटना घडल्याचा बातम्या तुम्ही आजवर ऐकल्या असतील. यात काहीजण विनाकारण इतरांसोबत भांडण करतात तर काही रस्त्यावरच गोंधळ करायला सुरुवात करतात. मात्र आता राजस्थानच्या (Rajasthan) धौलपूरमधून एक अजब बातमी समोर आली आहे. यात दारू पार्टी करताना तीन मित्रांनी चक्क साप भाजून खाल्ला (Drunk Man ate a Roasted Snake). यानंतर यातील एकाची अवस्था इतकी वाईट झाली की तो अनेक तास बेशुद्ध राहिला. ही घटना सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. हे जाणून सगळेच हैराण झाले आहेत. हे तीन मित्र दारू पार्टी करत होते, इतक्यात त्यांना जवळच एक साप दिसला. साप दिसताच त्यांनी हा साप तीन भागात कापला. यानंतर त्यांनी साप भाजून खाल्ला. मिळालेल्या माहितीनुसार, यातील एकाची अवस्था इतकी वाईट झाली की तो 12 तास बेशुद्ध राहिला. मिळालेल्या माहितीनुसार, पिपरीपुरा कालव्याजवळ ही घटना घडली. इथेच तिन्ही मित्र बसून दारू पार्टी करत होते. जवळच्या झाडीतून साप निघताना पाहून त्यांनी त्याला पकडले आणि त्याचं तोंड तसंच शेपूट कापून टाकलं. नंतर विस्तवात भाजून त्यांनी हा साप खाल्ला. साप खाल्ल्यानंतर यातील एकाची तब्येत बिघडली आणि तो बेशुद्ध झाला. त्याला जवळच्या रुग्णालयात नेले असता ही बाब समोर आली.आश्चर्य म्हणजे 12 तासांनंतर या व्यक्तीला शुद्ध आली. शुद्धीवर आल्यानंतर या व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आला, मात्र त्याने भाजलेला साप खाल्ल्याची चर्चा दूरवर पसरली आहे. जो कोणी हे ऐकत आहे, तो त्या व्यक्तीच्या मूर्खपणाबद्दल आश्चर्य व्यक्त करत आहे. दारूच्या नशेत त्याने केलेल्या या कृत्यामुळे त्याचा जीवही जाऊ शकत होता. या घटनेत सहभागी असलेल्या तीन जणांची नावे आहेत - अंतर सिंग, जोगिंदर आणि शिवराम. ते तिघं मिळून व्यवसाय करण्याच्या तयारीत होते. यावरच ते दारु पार्टीदरम्यान चर्चा करत होते.
  Published by:Kiran Pharate
  First published: