मुंबई, 07 फेब्रुवारी : लग्न असोत किंवा कोणताही कार्यक्रम, महिलांमध्ये मेहंदी लावण्याचा क्रेज आहे. मेहंदीची चांगली डिझान हातावर काढणं महिलांना आवडते. तसेच मेहंदी लावण्याचे अनेक फायदे देखील सांगितले गेले आहेत. पण असं असलं तरी सैंदर्याचं साधन असलेली ही मेहंदी एका नऊ वर्षाच्या मुलीसाठी धोकादायक घडली.
नवी दिल्लीतील एका खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी मंगळवारी सांगितले की, नऊ वर्षांच्या मुलीच्या हाताला मेहंदी लावल्याने तिला मिरगीचा झटका आला. हे असामान्य असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
हे ही पाहा : एखाद्या व्यक्तीला फिट आल्यानंतर त्याच क्षणी काय करावं?
मेहंदी लावल्यानंतर मुलीला एपिलेप्टिक फिट किंवा मिरगी येत असल्याचे असल्याचे पालकांनी सांगितले. जेव्हा या मुलीने मेहंदी लावली तेव्हा तिला प्रथम क्रॅम्प आला, वीस सेकंदानंतर ती बेशुद्ध पडली. त्यानंतर वर्षभरानंतर पुन्हा मेहंदी लावल्यानंतर तिला असेच दोन झटके आले. ज्यानंतर तिच्या पालकांनी तिला रुग्णालयात आणले.
येथे न्यूरोलॉजी विभागाचे वरिष्ठ डॉक्टर डॉ. सेठी यांनी मुलीच्या या केसवर काम केले. त्यांच्यासाठी ही एक अनोखी घटना आहे. जी अगदी असामान्य आहे. ते म्हणाले की हे रिफ्लेक्स एपिलेप्सीचे एक असामान्य प्रकरण होते, जेथे वासामुळे या मुलीली फिट किंवा मिरगी येऊ लागली. पण तर इतर अपस्माराचे किंवा मिरगीचे दौरे सहसा मेंदूतील रासायनिक आणि विद्यूत कंपन लहरींचे संतुलन बिघडल्याने येतात असेल त्यांनी सांगितले.
डॉक्टरांनी जेव्हा या मुलीला मेहंदी लावलेला हात तिच्या छातीजवळ आणला तेव्हा तिला पुन्हा झटके येऊ लागले. तेव्हा डॉक्टरांना या केसचं निदान झालं. सुगंधामुळे एपिलेप्सी ट्रिगर करण्याचे हे एक असामान्य प्रकरण आहे.
या प्रकरणानंतर पालकांनी मुलाला मेहंदी लावणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला. रुग्णाची प्रकृती आता स्थिर आहे. डॉक्टर या केसचा अभ्यास करत आहेत आणि या मुलीला यामधून कसं बाहेर काढलं जाईल यावर विचार केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking, Shocking news, Social media, Social media trends, Top trending