सेक्ससाठी नसते Sexting! संशोधनातून समोर आला अशा मेसेजमागचा पार्टनरचा हेतू

सेक्ससाठी नसते Sexting! संशोधनातून समोर आला अशा मेसेजमागचा पार्टनरचा हेतू

टेक्सास टेक युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ सायकोलॉजिकल सायन्सच्या संशोधकांना सेक्सटिंगबाबत एक नवा रिसर्च केला आहे. यामध्ये सेक्सटिंगमागचा खरा हेतू उलघडण्यात आला.

  • Share this:

टेक्सास, 12 डिसेंबर : आजच्या काळात, बदलेल्या प्रेमाच्या स्वरूपाबरोबरच प्रेम व्यक्त करण्याचे माध्यमही बदलले आहे. याआधी भेट देऊन किंवा एकांतात भेटून प्रेम व्यक्त केले जात होते. मात्र सध्या प्रेम व्यक्त करण्यासाठी सेक्सटिंग (सेक्सबाबत बोलणे) या प्रकारचा अवलंब केला जात आहे. यातून साथीदार एकमेकांशी शाररिक संबंधांविषयी किंवा लैंगिक संबध जपण्याबाबत चर्चा करतात. परंतु नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की सेक्सटिंगबद्दल लोकांमध्ये अनेक गैरसमजूती आहेत. डेली मेल.कॉम वर सेक्सटिंगबद्दल एक वेगळा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.

टेक्सास टेक युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ सायकोलॉजिकल सायन्सच्या संशोधकांना असे आढळले आहे की, सेक्सटिंग करणारे सुमारे दोन तृतीयांश लोक म्हणजे जोडीदाराला कामुक संदेश पाठवतात, मात्र हे शाररिक संबंध वाढवण्यासाठी केले जात नाही. तर, सेक्सटिंग हे फक्त संवाद वाढवण्यासाठी केले जाते. सेक्सटिंग करताना साथीदारच्या अपेक्षा या जेवणासाठी किंवा कॉफीसाठी बाहेर बोलवणे असते.

वाचा-आता पुरुषांसाठी आलं गर्भनिरोधक इंजेक्शन, 13 वर्षांपर्यंत टेंशन नाही!

टेक्सासच्या विद्यापीठानं या रिचर्ससाठी लोक जोडीदाराला कोणत्या हेतूनं सेक्सटिंग (लैंगिक संबंधसाठी मेसेज) पाठवतात. यासाठी काही विद्यार्थ्यांनी 160 लोकांचे सर्वेक्षण केले, ज्यांचे वय 18 ते 69 दरम्यान आहे. या सर्वेक्षणात सामील असलेल्यांना लैंगिक संबंधांमागील त्यांचे हेतू काय आहे, त्यांच्या नात्यात त्यांना कसे वाटते आणि त्यांच्या लैंगिक सवयींबाबत विचारण्यात आले. यासाठी काही प्रश्नांची प्रश्नावली तयार करण्यात आली होती.

वाचा-तुम्हाला स्पर्म काउंट वाढवायचाय? तर 'ही' गोष्ट दररोज खा, नक्कीच होणार फायदा

एका ऑनलाइन अभ्यासानंतर, संशोधकांनी असे सांगण्यात आले आहे की, सेक्सटिंग करण्यामागे ही तीन प्रमुख कारण असतात. यातील पहिले कारण म्हणजे काही लोक सेक्सटिंग हे माध्यम कामुक प्रणय (फोरप्ले) यासाठी वापतात. तर, काहींनी नातेसंबंध अधिक चांगले करण्यासाठी अशा मेसेजचा वापर केला जातो, असे सांगितले. तर, जास्तीत जास्त लोकांनी सेक्सटिंगचा वापर हा संवाद वाढवण्यासाठी आणि आपल्या साथीदाराला जेवणासाठी किंवा कॉफीसाठी घेऊन जाण्यासाठी असते.

वाचा-आपल्या पार्टनर सोबत करा हे काम, घरात नांदेल सुखच सुख!

(टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सुचना ही माहिती टेक्सास टेक युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ सायकोलॉजिकल सायन्सच्या अहवालावर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.)

Published by: Priyanka Gawde
First published: December 12, 2019, 9:57 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading