तेल अव्हिव, 27 जून : सोशल मीडियावर एका व्हिडीओने खळबळ उडवून दिली आहे. युनायटेड नेशन्सचा (United Nations) एक अधिकारी महिलेबरोबर सेक्स करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. UN च्या कारमध्ये शारीरिक संबंध ठेवल्याच्या या व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. इस्रायलमधील तेल अव्हिव (Tel Aviv) याठिकाणाहून हा व्हिडीओ समोर आला आहे. यानंतर संयुक्त राष्ट्रांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की, ही घटना अंत्यंत धक्कादायक आहे. या व्हिडीओमध्ये धक्कादायक बाब म्हणजे शारिरीक संबध ठेवणाऱ्या दोघांव्यतिरिक्त तिसरी व्यक्ती कार चालवत आहे.
या व्हिडीओमध्ये असे दिसत आहे की, एक लाल रंगाचे कपडे घातलेली एक महिला एका पुरुषासह कारच्या मागील सीटवर आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर यूएनने निवेदन जारी केले आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या व्हिडीओत असणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. इस्रायलमधील शांतता संघटनेच्या कर्मचाऱ्यांवर संशय व्यक्त केला जात आहे. ही गाडी वाहतूक सिग्नलवर थांबल्यावर हा व्हिडीओ काढण्यात आल्याचे मीडिया अहवालात सांगितले आहे. लोकमतने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
(हे वाचा-मुलाचं दुसरं लग्न करण्यासाठी सूनेचा अडसर, सासरच्या मंडळींनी मिळून रचला कट आणि...)
संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस एंटोरियो गुटेरेस यांच्या प्रवक्ते स्टीफन डुजारिक यांनी या कृत्याचा विरोध केला आहे. त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की हा व्हिडीओ अत्यंत घृणास्पद आहे. आतापर्यंत अशी माहिती उघड झाली आहे की ही कार युनायटेड नेशन्स ट्रस्ट सुपरव्हिजन ऑर्गनायझेशन'ची आहे. याचा गांभीर्याने तपास केला जात आहे.
डुजारिक यांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ ज्याठिकाणी शूट झाला ती जागा कोणती हे देखील स्पष्ट झाले आहे. ही जागा हायारकोन रोड आहे, ज्याठिकाणी कायम गर्दी असते. यामध्ये दोघांच्या संमतीने शारिरीक संबंध ठेवण्यात आले होते की पैसे देण्यात आले होते, याचा तपास गांभीर्याने केला जाईल असंही ते म्हणाले.
(हे वाचा-भयंकर! शेजारील महिला घ्यायच्या चारित्र्यावर संशय, पुण्यात विवाहितेची आत्महत्या)
नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येणार आहे. संबंधित व्यक्तीवर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते त्याचप्रमाणे संघटनेकडून त्यावर बंदी घालण्यात येऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.