Home /News /viral /

VIDEO: 4 मुलं, 2 महिला आणि 1 चालक; एका दुचाकीवर 7 जण करत होते प्रवास, पोलिसांना सांगितलं अजब कारण

VIDEO: 4 मुलं, 2 महिला आणि 1 चालक; एका दुचाकीवर 7 जण करत होते प्रवास, पोलिसांना सांगितलं अजब कारण

व्हिडिओमध्ये (Shocking Video) दिसत आहे की, एक व्यक्ती त्याच्या बाईकवर स्वतःसह 7 जणांना बसवून प्रवास करत आहे. या दुचाकीवर 4 मुलं, 2 महिला आणि चालक स्वतः असे सात जण बसलेले आहेत

    पाटणा 31 मार्च : बिहारमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून सर्वसामान्यांसोबतच पोलीस-प्रशासनही हैराण झालं आहे. या व्हिडिओमध्ये सात जण दुचाकीवरून जाताना दिसत आहेत (Seven People Rides On A Bike). सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पोलीस कर्मचाऱ्याने दुचाकीस्वाराला थांबवल्यावर त्या व्यक्तीने असं काही उत्तर दिलं, जे ऐकून पोलीस कर्मचारीही चक्रावून गेले. म्हशीला विनाकारण काठीने मारत होते 5 लोक; काहीच वेळात मिळालं कर्माचं फळ, VIDEO एकदा बघाच व्हिडिओमध्ये (Shocking Video) दिसत आहे की, एक व्यक्ती त्याच्या बाईकवर स्वतःसह 7 जणांना बसवून प्रवास करत आहे. या दुचाकीवर 4 मुलं, 2 महिला आणि चालक स्वतः असे सात जण बसलेले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या व्यक्तीने दुचाकी चालवताना हेल्मेटही घातलेलं नाही. हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर नेटकरी हैराण झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दुचाकीस्वार शिवहर जिल्ह्यातील नवाब हायस्कूलजवळून जात असताना एका पोलिसानी त्याला अडवलं. यानंतर पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना खडसावले. व्हिडिओमध्ये पोलीस कर्मचारी अशाप्रकारे दुचाकी न चालवण्याचा सल्ला देताना दिसत आहे. मात्र, त्या व्यक्तीने उत्तरात जे सांगितलं ते ऐकून पोलीसही चक्रावून गेले. दुचाकीस्वाराने सांगितलं की, तो हॉस्पिटलला जात आहे. तुम्हीही AC वापरत असाल तर सावधान; अशा ठिकाणी बसला साप ज्याचा कोणी विचारही केला नसेल, VIDEO हा व्हिडिओ समोर आल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे प्रमुख रघुनाथ प्रसाद यांनाही स्पष्टीकरण द्यावं लागलं. ते म्हणाले की, अशा दुचाकी चालवल्याने अपघात होण्याची शक्यता वाढते. लोकांनी अशाप्रकारे दुचाकी चालवू नयेत आणि जीव धोक्यात घालू नये. या व्यक्तीवर कोणत्या प्रकारची कारवाई करण्यात आली हे सध्या तरी कळू शकलेलं नाही. मात्र सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. काही लोक याला पेट्रोलच्या वाढत्या किमतींशी जोडत आहेत आणि सांगतायेत की इंधनाच्या किमती वाढत असतील तर लोक असंच करतील.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Bike riding, Shocking video viral

    पुढील बातम्या