आई ही आईच असते! जखमी बाळाला घेऊन माकडीण पोहोचली रुग्णालयात, डॉक्टरांचेही डोळे पाणावले

आई ही आईच असते! जखमी बाळाला घेऊन माकडीण पोहोचली रुग्णालयात, डॉक्टरांचेही डोळे पाणावले

बाळाला उराशी धरून ती आई रुग्णालयाच्या दाराजवळ बसली होती आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला आपल्या मुकभाषेत समजवण्याचा प्रयत्न करत होती.

  • Share this:

आतापर्यंत माणसांमधली माणूसकीचे किस्से अनेक ऐकले असतील पण प्राण्यांमधील मानवतेचं एक वेगळं उदाहरण सीहोरकरांना (Sehore) पाहायला मिळाला. जिल्हा पशु रुग्णालयात एक माकडीण (Female Monkey) आपल्या जखमी पिल्लाला घेऊन गेली तेव्हा तिथे उपस्थित प्रत्येक माणसाचे डोळे पाणावले. पण डॉक्टरांनी (Doctors) जेव्हा त्या पिल्लाला तपासलं ते आधीच मरण पावलं होतं.

बाळाला घेऊन पोहोचली जिल्हा पशु रुग्णालयात-

सीहोर शहरातील जुन्या तुरुंगाच्या भिंतीच्या बाजूला विजेची 11 केवीची लाइन आहे. या लाइनच्या बाजूला असलेल्या झाडावर माकडं खेळत होती. यावेळी माकडीणीचं पिल्लू विजेच्या तारेला लागलं. विजेच्वया झटक्याने तो लगेच खाली कोसळला. यानंतर आईने पिल्लाला जवळच्या पशु रुग्णालयात नेलं. या मूक प्राण्याची आपल्या पिल्लासाठीची धावपळ पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. पिल्लाला उराशी धरून ती आई रुग्णालयाच्या दाराजवळ बसली होती आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला आपल्या मुकभाषेत समजवण्याचा प्रयत्न करत होती. माझ्या बाळावर उपचार करा... त्याचे प्राण वाचवा असंच काहीसं ती आपल्या हावभावातून सांगत होती. दरम्यान, तिच्या जवळ येणाऱ्या प्रत्येक व्यक्तिकडे ती रागानेही पाहत होती.

डॉक्टरांनी केलं हे काम-

जिल्हा पशु रुग्णालयातील टीमच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. डॉक्टरांनी त्या बाळाला तपासले तोवर ते बाळ मृत पावले होते. थोड्यावेळाने आई मृत बाळाला घेऊन आपल्या समूहात गेली आणि तिला जाताना पाहताना प्रत्येकाचे डोळे पाणावले होते.

या देशात जास्त मुलांना जन्म दिला तर मिळतं 'सुवर्ण पदक'

सेक्सविषयी बदलले लोकांचे विचार, पाहा नवीन Research काय म्हणतो!

विराट कोहलीचा हा आहे फिटनेस मंत्र, जाणून घ्या त्याचं Diet Plan

वाघिणीसाठी दोन सख्खे भाऊ भिडले, जंगलातील थरारक घटनेचा Viral Video

आता ब्रेकअप झाल्यावरही व्हा खूश, कारण त्याचेही आहेत अनोखे फायदे!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 5, 2019 08:29 PM IST

ताज्या बातम्या