मराठी बातम्या /बातम्या /Viral /आता हे चॅलेंज तुम्ही घ्याच! या फोटोत पाल शोधून दाखवा बरं

आता हे चॅलेंज तुम्ही घ्याच! या फोटोत पाल शोधून दाखवा बरं

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोत नेटिझन्स सध्या पाल शोधण्यात गुंतलेत.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोत नेटिझन्स सध्या पाल शोधण्यात गुंतलेत.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोत नेटिझन्स सध्या पाल शोधण्यात गुंतलेत.

  नवी दिल्ली, 27 जून : रंग बदलणारा सरडा तर तुम्हाला माहितीच आहे. सहजासहजी तो आपल्या नजरेत पडत नाही. कारण तो जिथं असतो, त्याप्रमाणे आपला रंग बदलतो. सध्या सोशल मीडियावर (Social media) असाच काहीसा फोटो व्हायरल (Viral Photo) होत आहे. ज्यामध्ये तुम्हाला पाल शोधण्याचं चॅलेंज दिलं जातं आहे.

  एका ट्विटर युझरने हा फोटो शेअर केला आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हाला फक्त झाडं-झुडपं, काटे, दगडांशिवाय दुसरं काहीच दिसत नाही आहे. मात्र हा फोटो शेअर करणाऱ्या या फोटोत एक पाल (Lizard) दडल्याचं सांगितलं आहे. सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये नेटिझन्स यात लपललेली पाल शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

  कित्येक युझर्सना प्रयत्न करूनही पाल सापडली नाही, कित्येक जण अजूनही शोधतच आहेत. शेवटी कंटाळून काही जणांनी या अशा प्रतिक्रिया दिल्यात. ज्यामध्ये त्यांनी दुसऱ्या पालीचा, एखादा दुसरा फोटो किंवा अॅनिमिटेडेट व्हिडीओ टाकून आपण पाल शोधल्याचं म्हटलं.

  तर काही जणांना पाल सापडली आहे. या फोटोत पाल शोधणं म्हणजे खूप आव्हानात्मक होतं कारण ती अशा जागी आहे, जिथं सहजासहजी सापडणं अशक्य आहे, असं त्यांनी सांगितलं.

  हे वाचा - 'या' कपाटात लपली आहे मांजर; शोधा बरं तुम्हाला सापडतेय का?

  मात्र ही पाल कुठे आहे, हे मात्र त्यांनी सांगितलं नाही.

  बरं तुम्हाला सापडली की नाही पाल? चालवा चालवा जरा डोकं चालवा. नीट फोटोत शोध. तुम्हाला पाल नक्की सापडेल.

  हे वाचा - शिकारीसाठी आलेल्या बिबट्याला सरड्यानं दिला 'जोर का झटका', काय केलं पाहा VIDEO

  तुम्हालाही पाल सापडली नसेल, तुम्हीही शोधून शोधून थकला असाल तर मग ज्या ट्विटर युझरने फोटोत पाल शोधण्याचं आव्हान दिलं, त्याच ट्विटर युझरने ही पाल नेमकी कुठे दडली आहे, ते दाखवलं आहे.

  तुम्हाला गेम आवडला असाल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना ही बातमी नक्की शेअर करा आणि त्यांनाही या फोटोतून पाल शोधण्याचं चॅलेंज द्या.

  संपादन - प्रिया लाड

  First published:

  Tags: Lifestyle, Lizard, Viral photo