नवी दिल्ली 17 जुलै : बहुतेकदा तुम्ही पक्षी अगदी शांत आणि माणसांपासून दूर पळताना पाहिले असतील. मात्र, प्रत्येक ठिकाणी ही परिस्थिती सारखी नाही. काही पक्षांना आता माणसांची जास्त भीती वाटू लागली आहे. याच कारणामुळे आता हे पक्षीही हल्ले करू लागले (Seagulls Attacking on Humans) आहेत. यातील एक पक्षी आहे सीगल (Seabird Seagulls). हा पक्षी ब्रिटनमध्ये आढळतो. या पक्षाची चोच इतकी मजबूत असते की त्यानं वार केल्यास माणसाच्या डोक्यात खोल जखम होते. यासोबतच हा पक्षी वार करत माणसाचं रक्तही शोषून (Sucks Blood From The Head) घेतो.
सीगल हा पक्षी सहसा समुद्राच्या किनाऱ्यावर आढळतो. मात्र, सध्याच्या काळात हे पक्षी अतिशय आक्रमक झाले आहेत. यासोबतच आता ते बीचच्या सुरक्षेसाठी तैनात असणारे गार्ड आणि पत्र पोहोचवणाऱ्या पोस्टमनवरही हल्ला करू लागले आहेत. त्यांच्या दहशतीचा अंदाज तुम्ही यावरुनही लावू शकता की समुद्र किनाऱ्यावर ड्यूटी करणारे बहुतेक कर्मचारी हेल्मेट किंवा डोक्यावर काहीतरी मोठी वस्तू ठेवूनच इथे येतात. जेणेकरून सीगलपासून बचाव शक्य होईल. याशिवाय बरेचशे लोक झाडांच्या मागे लपून ड्यूटी करतात.
दारूडं माकड! ऐटीत झाकण उघडत तोंडाला लावली बाटली; VIRAL VIDEO पाहून व्हाल अवाक
डेली मेलच्या वृत्तानुसार, सीगलच्या हल्ल्याच्या घटना अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मात्र, एस्सेक्सच्या थोरपे बेमध्ये समुद्राच्या किनाऱ्यावर याच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. याचे शिकार गार्ड किंवा रॉयल मेलचे कर्मचारी ठरत आहेत. त्यांच्याकडे पत्र पोहोचण्याची जबाबदारी आहे. या कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा ते पायी बाहेर पडतात तेव्हा सीगल त्यांच्यावर हल्ला करतात. यामुळे त्यांच्या डोक्याला दुखापत होते.
अखेर आता रॉयल मेलनं आपल्या ग्राहकांसाठी एक सूचना जारी केली आहे. यात म्हटलं आहे, की समुद्राच्या जवळ असलेल्या भागांमध्ये सीगलचे हल्ले वाढले आहेत, त्यामुळे पत्र पोहोचवण्यात उशीर होऊ शकतो. यासोबतच त्यांच्याकडून कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठीही व्यवस्था केली जात आहे.
VIDEO: डोंबिवलीत शुल्लक कारणावरुन सोसायटीतील नागरिकांत तुंबळ हाणामारी
विशेषतज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सीगल सुरुवातीला केवळ लहान प्राण्यांची शिकार करायचे. मात्र, मध्यंतरी माणसांनी त्यांना बरीच हानी पोहोचवली. याच कारणामुळे आता ते माणसांकडे एक संकट म्हणून पाहतात. अशात कोणताही मनुष्य दिसल्यास ते थेट डोक्यावर हल्ला करतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Attack, Viral news