मुंबई, 01 एप्रिल : सिंह, वाघ, बिबट्या, मगर अशा हिंस्र प्राण्यांना एखाद्या प्राण्याची शिकार करताना तुम्ही पाहिलं असेल. साप, अजगर यांना एखादा जिवंत प्राणी गिळताना पाहिलं असेल. पण कोणत्या पक्ष्याला तुम्ही असं करताना पाहिलं आहे का? सध्या अशाच एका पक्ष्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्याने चक्क एक जिवंत ससा गिळला आहे
(Seagull bird swallow alive rabbit).
आकाशातून जमिनीकडे किंवा पाण्यात झेप घेत शिकार करणारी घार, ससाणा असे पक्षी तुम्हाला माहिती आहेत. पण या पक्ष्याने जशी शिकार केली आहे, ती पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही. या पक्ष्याच्या शिकारीची पद्धत पाहून तुम्ही हैराण व्हाल. पाण्यात बगळे जसे चोचीत मासे धरून काही सेकंदातच गिळतात तसं या पक्ष्याने भलामोठा ससा गिळला आहे.
हे वाचा - बापरे! महिलेच्या कानात घुसला जिवंत खेकडा आणि...; VIDEO पाहूनच हादराल
व्हिडीओत पाहू शकता काही पक्षी उभे आहेत. एका पक्ष्यासमोर ससा दिसतो आहे. पाहता पाहता हा पक्षी सशाला आपल्या चोचीत घेतो आणि हळूहळू आपल्या तोंडात ढकलताना दिसतो. काही क्षणातच तो सशाला पूर्णपणे गिळंकृत करतो.
हा पक्षी म्हणजे सीगल आहे. जो एक समुद्री पक्षी आहे. सामान्यपणे समुद्रात ते माशांची शिकार करतात, मासे खाताना दिसतात. पण या व्हिडीओत मात्र ते माशासारखं चक्क एका सशाला हा पक्षी खाताना दिसला.
हे वाचा - OMG! जेवण करताना अचानक प्लेटमधील मासा झाला जिवंत; VIDEO मध्ये पाहा पुढे काय घडलं
Storyful Viral नावाच्या युट्यूब अकाऊंटवर हा शॉकिंग व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या चॅनेलमध्ये दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ वेल्स आयलँडमधील आहे. व्हिडीओ पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत. हा व्हिडीओ पाहताच तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.