मुंबई, 05 मे : समुद्राच्या उंचच उंच लाटा तुम्ही पाहिल्या असतील, त्सुनामीमध्ये आलेली सर्वात मोठी लाटही तुम्ही पाहिली असेल. पण आता समुद्राच्या लाटेचा असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही. समुद्राने चक्क आकाशाकडे झेप घेतली आहे. समुद्राच्या लाटांनी ढगांना स्पर्श केला आहे. हा अद्भुत असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे
(Sea wave touching sky).
समुद्राच्या लाटा पाहण्यासारखं दुसरं सुख नाही. या लाटा पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी त्यांचा आवाज ऐकण्यासाठी लोक मुद्दामहून समुद्रकिनाऱ्यावर फिरायला जातात. या लाटा जितक्या पाहायला सुंदर वाटतात, तितकीच त्यांना पाहू धडकीही भरते. त्सुनामीत येणाऱ्या उंच लाटांचे व्हिडीओ पाहूनच अंगावर काटा येतो. मग अशा लाटा जर आकाशापर्यंत पोहोचल्या तर...
क्षितिजावर तुम्ही आकाश आणि समुद्र यांना टेकलेलं पाहिलं आहे. पण तसं आपल्याला फक्त दिसतं, प्रत्यक्षात तसं नसतं. कारण समुद्र आणि आकाश ही दोन्ही विरुद्ध टोकं. त्यांच्यात बरंच अंतर आहे. त्यामुळे त्या आकाश आणि समुद्र एकत्र येणं अशक्यच. पण हे अशक्यही शक्य झाल्याचं पाहायला मिळालं ते या व्हिडीओत. ज्यात समुद्रात इतकी उंच लाट आली की ती थेट आकाशापर्यंत पोहोचली. या लाटेने ढगांना स्पर्श केला.
हे वाचा - 100 वर्षांचे सुपरफास्ट आजोबा! अवघ्या 26.34 सेकंदात पार केलं 100 मी. अंतर; वर्ल्ड रेकॉर्डही मोडला
व्हिडीओत पाहू शकता ही लाट ढगांपर्यंत जाते, ढगांना धडकते तेव्हा ढगही लाटेच्या धडकेने फुटतात आणि धूरच धूर होतो. हा व्हिडीओ पाहून त्यावर कित्येकांचा विश्वासच बसत नाही.
हा व्हिडीओ तसा जुना आहे. @buitengebieden नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. जो तुफान व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ एडिटेड असावा असंच अनेकांना वाटतं आहे.
हे वाचा - Shocking! Spiderman सारखा 60 Floor Tower वर चढला तरुण आणि...; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO
रिपोर्टनुसार तुम्ही जे या व्हिडीओत पाहत आहात तो एडिटेड नाही तर हे प्रत्यक्षात घडलेलं आहे. फक्त या लाटा जिथं धडकल्या ते ते ढग नाहीत तर एअरोसोल आहेत. जे हवेत सूक्ष्म कण किंवा तरल थेंबांच्या स्वरूपात असतात. हे सामान्यपणे समुद्र आणि डोंगरांवरही पाहायला मिळतात. जे अगदी ढगांसारखेच दिसतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.