Home /News /viral /

सतत 2 वर्ष घेत होती ड्रग्स, अशी झाली अवस्था; पण 4 महिन्यात बदललं अख्खं आयुष्य

सतत 2 वर्ष घेत होती ड्रग्स, अशी झाली अवस्था; पण 4 महिन्यात बदललं अख्खं आयुष्य

दोन वर्ष सतत, दररोज ड्रग्स घेण्याच्या तिच्या सवयीमुळे तीचं आयुष्य अगदी बदलून गेलं होतं. एवढंच नाही, तर दररोजच्या ड्रग्समुळे तिच्या चेहऱ्यावर मुरमं, डाग-ढब्बे आले होते. तिची हाडं ठिसूळ होऊन त्यात त्रास होऊ लागला.

  लंडन, 14 नोव्हेंबर : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग्सच्या दिशेनेही तपास सुरू आहे. सतत ड्रग्स सेवनाची सवय लागल्यावर, त्यापासून सुटका होत नसल्याचं बोललं जातं. पण काही असेही लोक आहेत, ज्यांती अतिशय धोकादायक ड्रग्स घेण्याच्या सततच्या सवयीनंतर, स्वत:ला या यातून यशस्वी बाहेर काढलं आहे. अशाच एका स्कॉटलँडमध्ये (scotland girl) राहणाऱ्या 27 वर्षीय डेमी निकोल डनलप (Demi-Nicole Dunlop) या तरुणीने स्वत:ला ड्रग्सच्या (drugs) सवयीतून मुक्त केलं आहे. डेमी मागील दोन वर्षांपासून वेग-वेगळ्या ड्रग्सचं सेवन करते. ज्यात हिरोइन आणि कोकीनसारख्या (Cocaine) नशील्या पदार्थांचा समावेश होता. दोन वर्ष सतत, दररोज ड्रग्स घेण्याच्या तिच्या सवयीमुळे (Drug Addict) तीचं आयुष्य अगदी बदलून गेलं होतं. एवढंच नाही, तर दररोजच्या ड्रग्समुळे तिच्या चेहऱ्यावर मुरमं, डाग-ढब्बे आले होते. तिची हाडं ठिसूळ होऊन त्यात त्रास होऊ लागला. यादरम्यानच ती नेहमी स्वत:चे फोटो काढायची. ज्यावेळी ड्रग्सच्या सेवनानंतर तिच्या शरीराला त्रास होत असल्याचं तिच्या लक्षात आलं, त्यावेळी तिने स्वत:वर इलाज, ट्रिटमेंट करायचं ठरवलं. ट्रिटमेंटच्या केवळ ४ महिन्यातच डेमीचं आयुष्य (life-changing-story) बदललं. तिच्या तब्येतीत जबरदस्त सुधारणा झाली. चेहऱ्यावरील डाग-ढब्बे जाऊन चेहराही सुंदर दिसू लागला. DeMi-Nicole फेसबुकवर शेअर केली होती आपली कहाणी - ड्रग्सच्या विळख्यातून स्वत:ला सोडवल्यानंतर, डेमीने आपल्या ट्रान्सफॉर्मेशनचे काही फोटो फेसबुकवर शेअर केले होते. इतर ड्रग्स एडिक्ट्सही माझ्या सारखेच यातून बाहेर येऊ शकतात, निरोगी होऊ शकतात, हाच विश्वास पटवून देण्यासाठी तिने फोटो शेअर केले, असल्याचं म्हटलंय.

  (वाचा - लॉकडाऊनमध्ये सोडावी लागली शाळा अन् दुकानात केलं काम, अखेर चिमुरड्याला मिळाली मदत)

  'मी स्वत:ला या ड्रग्समधून सोडवू शकते, हे समजण्यास मला मोठा काळ गेला, परंतु उशिरा आलेल्या शहाणपणाने का होईना मी आता हिरोइन आणि कोकीन या दोन्ही ड्रग्सच्या नशेतून मुक्त झाली आहे. दोन वर्ष सतत नशा केल्यानंतरही, केवळ चार महिन्यात मी हे निरोगी आयुष्य शक्य केलं असल्याचं, तिने सांगितलं. DeMi-Nicole Dunlop pic फेसबुकवर डेमीचे 3500 फ्रेंड्स आहेत. 'मी माझे आधीचे आणि नंतरचे असे फोटो दाखवू शकते, की ड्रग्सची नशा किती धोकादायक, त्रासदायक आहे. जर याची कोणालाही सवय असल्यास, तुम्हीही माझ्यासारखंचं यातून मुक्त होऊ शकता. माझ्यावर विश्वास ठेवा, हे शक्य आहे, तुम्ही या नशेच्या विळख्यातून बाहेर येऊ शकता', असा विश्वास व्यक्त करत तिने फेसबुक पोस्ट केली आहे.

  (वाचा - ना सचिन, ना विराट; केवळ 'या' एका भारतीय खेळाडूला फॉलो करतं instagram)

  'लोक काय म्हणतील या भीतीने मी माझे आधीचे फोटो फेसबुकवर शेअर करायला घाबरत होती, परंतु माझा अनुभव शेअर केल्यानंतर अनेकांनी मला सपोर्ट केला', असल्याचं ती म्हणाली. अद्यापही डेमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  (वाचा - Gold Rate उंचावत असताना उर्वशी रौतेलाने केला 24 कॅरेट सोन्याचा मेकअप)

  Published by:Karishma Bhurke
  First published:

  Tags: Viral photo

  पुढील बातम्या