अजब जुगाड! एका तरुणानं चक्क झाडाला बांधली Scorpio कार

अजब जुगाड! एका तरुणानं चक्क झाडाला बांधली Scorpio कार

'महिंद्रा अॅण्ड महिंद्रा' ग्रूपचे चेअरमन आनंद महिंद्रा सोशल मीडियावर याचा एक मजेशीर फोटो शेअर केला आहे.

  • Share this:

मुंबई, 08 ऑक्टोबर : आपली वस्तू गहाळ होऊ नये किंवा चोरी नये म्हणून आपण ती नीट ठेवतो किंवा त्या वस्तुला कड्या कुलपात बंद करून ठेवतो असाच एक प्रकार गाडीसोबत घडला आहे. हा प्रकार पाहून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल. एका व्यक्तीनं आपली स्कॉर्पिओ गाडी चक्क झाडाला बांधून ठेवली आहे.

'महिंद्रा अॅण्ड महिंद्रा' ग्रूपचे चेअरमन आनंद महिंद्रा सोशल मीडियावर याचा एक मजेशीर फोटो शेअर केला आहे. फोटो सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेणारा आहे. काळ्या रंगाची स्कॉर्पिओ SUV कार झाडाला बांधून ठेवली आहे. जशी आपण लोक चोरतील किंवा घेऊन जातील या भीतीनं सायकल साखळीने लॉक करतो किंवा बांधतो अगदी तसाच प्रकार या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोक यावप भन्नाट कमेंट्स करत आहेत.

हे वाचा-असा WWF चा थरार तुम्ही कधी पाहिला नसेल, 2 उंदरांमधल्या भांडणाचा दुर्मीळ VIDEO

स्कॉर्पियोच्या गाडीला लॉक करण्यासाठी हायटेक सोल्यूशन नाही असं गृहित धरलं तर लॉकडाऊनमध्ये मी कसं याकडे पाहात होतो. आता याची साखळी काढून मास्क लावून मी विकेण्डचा प्लॅन करणार असल्याचं आनंद महिंद्रा यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

एका युझरनं हे चित्र जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात महापूर आला आणि त्यामध्ये गाड्या वाहून गेल्या तशी गाडी वाहून जाऊ नये म्हणून हा जुगाड केल्याचं म्हटलं आहे. तर दुसऱ्या युझरनं लहान मुलांनी केलेली मस्करी असावी असं म्हटलं आहे. तिसरा युझर म्हणतो टायगर कैद मे है. तर एका युझरनं हत्ती सारख्या गाडीला एवढी मोठी सुरक्षा हवी असंही म्हटलं आहे. एका युझरनं ही गाडी चोरणं खूप सोपं आहे त्यामुळे अशा प्रकारचा जुगाड केल्याचं कमेंटमध्ये म्हटलं आहे. सोशल मीडियावर युझर्स तुफान कमेंट्स करत आहेत.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 8, 2020, 8:52 AM IST

ताज्या बातम्या