मराठी बातम्या /बातम्या /Viral /

अरे हे कसले धडे देतायेत! शाळेतील Video सोशल मीडियावर Viral; पालकांना बसला मोठा धक्का

अरे हे कसले धडे देतायेत! शाळेतील Video सोशल मीडियावर Viral; पालकांना बसला मोठा धक्का

शाळेचा व्हिडीओ पाहून पालकांच्या पायाखालची जमीन सरकली.

शाळेचा व्हिडीओ पाहून पालकांच्या पायाखालची जमीन सरकली.

शाळेचा व्हिडीओ पाहून पालकांच्या पायाखालची जमीन सरकली.

  • Published by:  Priya Lad

वॉशिंग्टन, 25 नोव्हेंबर : शाळा (School) म्हणजे विद्येचं माहेरघर. पालक आपल्या मुलांना इथं ज्ञान आत्मसात करण्यासाठी पाठवतात. पण एका शाळेत मात्र विद्यार्थी शिक्षणाऐवजी भलतेच धडे गिरवताना दिसला (School shocking video). धक्कादायक म्हणजे शिक्षकच विद्यार्थ्यांना अभ्यासाऐवजी भलतंच काहीतरी शिकवताना दिसले (Teachers Prank Gone Wrong). जे पाहून पालकांना मोठा धक्का बसला (Shocking video).

अमेरिकेच्या इलिनॉयसमधील (Illinois) एका शाळेतील व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) चांगलाच चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ पाहून या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. फक्त या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालकच नव्हे तर इतर पालकही व्हिडीओ पाहून शॉक झाले (Teachers Pranked with Mobile Phone).

टिनले पार्क हायस्कूलमधील (Tinley Park High School) हा व्हिडीओ टिकटॉकवर व्हायरल झाला आहे. ज्यात शिक्षक विद्यार्थ्यांना घेऊन असं काही करताना दिसले की समजताच तुम्हालाही जोर का झटका बसेल. आता तुम्ही म्हणाल असं या व्हिडीओत नेमकं आहे तरी काय? तर या शाळेत मोबाईल फोनसह एक व्हिडीओ बनवण्यात आला आहे.

हे वाचा - पोरं ती पोरं आता पोरीही! धावत्या रेल्वेत विद्यार्थ्यांचा खतरनाक Stunt video

व्हिडीओ पाहताच तो मोबाईल नाही तर बंदूकच आहे, असं वाटेल. कारण सर्वजण  मोबाईल हातात घेऊन बंदुकीप्रमाणे कॅमेऱ्यावर निशाणा साधत आहे. कोणत्या तरी शूटिंग सीनचा ते प्रँक करत आहेत. या प्रँकमध्ये शाळेतील शिक्षक, कर्मचारीही सहभागी आहेत. विद्यार्थ्यांनाही त्यांनी आपल्यासोबत घेतलं आहे.

फिल्मच्या माध्यमातून शाळेत एक मैत्रीपूर्ण वातावरण असल्याचं दाखवण्याचा ते प्रयत्न करत होते. पण उलटंच घडलं.  शाळेने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. तेव्हा पालकांनी यावर नकारात्मक कमेंट केला. हा मूर्खपणा असल्याची प्रतिक्रिया पालकांनी दिली. आधीच अमेरिकेतील शाळांमध्ये फायरिंगची प्रकरणं समोर येत असतात. अशा परिस्थितीत मुलांना अशा प्रँकमध्ये सहभागी करणं म्हणजे त्यांना चुकीचं शिक्षण देणं आहे.

हे वाचा - VIDEO- तरुणींना इम्प्रेस करण्यासाठी त्याने छतावरून मारली उडी; भारी पडली हिरोगिरी

दरम्यान या व्हिडीओला पालकांनी विरोध करताच शाळेनं यावर स्पष्टीकरण देताना सारवासारव केली. हा व्हिडीओ योग्यप्रकारे एडिट केला नाही नाहीतर शाळेच्या स्पिरिटला प्रमोट करणारा हा व्हिडीओ आहे, असं शाळा प्रशासनाने सांगितलं.

First published:

Tags: Student, Teacher, Viral, Viral news