मराठी बातम्या /बातम्या /Viral /

काळ आला होता पण वेळ नाही! अवघ्या 10 सेकंदावर मृत्यू फक्त 8 पावलांमुळे वाचला जीव; Watch Video

काळ आला होता पण वेळ नाही! अवघ्या 10 सेकंदावर मृत्यू फक्त 8 पावलांमुळे वाचला जीव; Watch Video

आपल्या दिशेने मृत्यू येत आहे याची कल्पनाही या मुलाला नव्हती. नकळतपणे त्याचा जीव वाचला. हे कोणत्या चमत्कारापेक्षा कमी नाही.

आपल्या दिशेने मृत्यू येत आहे याची कल्पनाही या मुलाला नव्हती. नकळतपणे त्याचा जीव वाचला. हे कोणत्या चमत्कारापेक्षा कमी नाही.

आपल्या दिशेने मृत्यू येत आहे याची कल्पनाही या मुलाला नव्हती. नकळतपणे त्याचा जीव वाचला. हे कोणत्या चमत्कारापेक्षा कमी नाही.

    मुंबई, 18 ऑगस्ट : मृत्यू कुणाच्याच हातात नाही. काही जणांचा चालता-बोलता मृत्यू होतो तर काही जण मृत्यूवरही मात करतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. काळ आला होता पण वेळ नाही, देव तारी त्याला कोण मारी असं म्हणतात ना... याचाच प्रत्यय या व्हिडीओतून येईल. एका विद्यार्थ्याने नकळतपणे मृत्यूवर मात केली आहे. अवघ्या 10 सेकंदावर मृत्यू होता पण त्याच्या फक्त 8 पावलांमुळे त्याचा जीव वाचला आहे. एका मुलाच्या दिशेने मृत्यू येत होता, याची कल्पनाही त्याला नव्हती. पण नकळतपणे त्याने याच मृत्यूलाही चकवा दिला आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल. याला नशीब म्हणावं, चमत्कार म्हणावं की देवाची कृपा हे तुम्हीच हा व्हिडीओ पाहून सांगा. व्हिडीओत पाहू शकता शाळेच्या युनिफॉर्ममध्ये पाठीला बॅग लावून एक मुलगा फुटपाथवरील रेलिंगजवळ एकटाच उभा आहे. काही क्षणात तो तिथून बाजूला होतो आणि तिथूनच काही अंतरावर पुढे चालत जातो. तिथं एका झाडापर्यंत तो पोहोचतो आणि त्याचवेळी एक कार फुटपाथच्या त्या रेलिंगला येऊन धडकते. ही कार तिथंच धडकते जिथं आधी हा मुलगा उभा राहिलेला असतो. हे वाचा - OMG! ट्रकच्या 3 चाकांखाली चिरडला तरी जिवंत राहिला; कसा झाला चमत्कार पाहा Shocking Video आपल्या दिशेने मृत्यू येत आहे हे या मुलालाही माहिती नव्हती. तो आपल्याच धुंदीत रमतगमत तिथून बाजूला होता आणि त्याचवेळी ही कार तिथं येतं. सर्वकाही फक्त 10 सेकंदात घडतं. @pantlp ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत. देव तारी त्याला कोण मारी, या मुलाचं नशीब बलवत्तर आहे, अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर उमटत आहेत. हे वाचा - 6000 फूट उंच डोंगराच्या कडेवरून झुलत होत्या; अचानक झोपाळा तुटला आणि... काळजाचा ठोका चुकवणारा Shocking video तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Accident, Viral, Viral videos

    पुढील बातम्या