नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : स्टेजवर परफॉर्म करताना काही वेळा जे घडू नये ते घडतं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एक विद्यार्थी स्टेजवर गेला असता शिक्षिकेसमोरच त्याची पँट घसरली. त्यानंतर पुढे असं काही घडलं ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल. कदाचित अशा परिस्थितीत कुणाला असं काही करताना तुम्ही पाहिलं नसेल. असं या व्हिडीओत काय आहे तुम्हीच पाहा.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, कोणता तरी कार्यक्रम आहे. शिक्षिका स्टेजवर उभी आहे. शिक्षिकेच्या हातात माईक आहे. माईकवर एका विद्यार्थ्याचं नाव घेऊन ती त्याला स्टेजवर बोलावते आणि आपल्या हातातील माईक त्या विद्यार्थ्याच्या हातात देते. विद्यार्थ्याचा हात आधीपासूनच पँटवर असल्याचं दिसतं. जसा तो माईक हातात घेतो आणि माईकवर बोलू लागतो, तशी त्याची पँट सरकते.
हे वाचा - Reel करणाऱ्या मुलांनी बस ड्रायव्हरला बनवलं मूर्ख, Video सोशल मीडियावर व्हायरल
'मछली जल की राणी है', हे गाणं तो गाताना दिसतो. तेव्हा त्याची पँट खाली पडते. तिथं जवळच शिक्षिका उभी असते. समोर बहुतेक विद्यार्थीही आहेत जे या व्हिडीओत दिसत नाही. या सर्वांसमोरच विद्यार्थ्याची पँट कोसळते.
आता अशी वेळ कुणावरही ओढावली तर साहजिकच आधी पँट सावरण्याची धडपड होईल किंवा पँट पुन्हा घालण्यासाठी ती व्यक्ती खाली वाकेल. पण या व्हिडीओतील हा मुलगा असं काहीच करत नाही. तो तसाच उभा राहतो आणि आपला परफॉर्मन्स देतो. त्याच्या चेहऱ्यावरही कोणतं टेन्शन दिसत नाही. आपल्या शरीरावर कपडे आहेत याच विश्वासाने तो सादरीकरण करताना दिसतो.
View this post on Instagram
butterfly__mahi नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Student, Teacher, Viral, Viral videos