Home /News /viral /

मंडपात पाहुण्यांसमोरच नवरदेवानं सांगितलं ते सिक्रेट; नवरीच्या भन्नाट रिअ‍ॅक्शनचा VIDEO VIRAL

मंडपात पाहुण्यांसमोरच नवरदेवानं सांगितलं ते सिक्रेट; नवरीच्या भन्नाट रिअ‍ॅक्शनचा VIDEO VIRAL

व्हायरल व्हिडिओमध्ये (Wedding Video) तुम्ही पाहू शकता, की नवरी आणि नवरदेव मंडपात बसलेले आहेत. ब्राह्मण नवरदेवाला लग्नानंतर काही गोष्टींचं पालन करायला सांगत आहे.

  नवी दिल्ली 09 ऑक्टोबर : सोशल मीडियावर (Social Media) लग्नसमारंभातील व्हिडिओ (Wedding Videos) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत राहतात. अनेकदा हे व्हिडिओ भावुक करणारे असतात, तर अनेकदा असे असतात की ते पाहूनच आपल्याला हसू आवरत नाही. आपल्या सर्वांना माहिती आहे, की लग्नाच्या वरातीत डान्स करण्यापासून स्टेजवरील नवरी नवरदेवाच्या (Bride Groom) फेऱ्यांपर्यंत प्रत्येकच गोष्ट अशी असते ज्यात भरपूर मस्ती आणि मस्करी सुरू असते. सध्या असाच आणखी एक व्हिडिओ समोर (Funny Wedding Video) आला आहे. यात दिसतं, लग्नमंडपातच ब्राह्मणाच्या एका प्रश्नाला नवरदेव असं उत्तर देतो की नवरी जोरजोराने हसू लागते. बाथरूममध्ये नवरा काढत होता विचित्र विचित्र आवाज; दरवाजा उघडताच हादरली बायको व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की नवरी आणि नवरदेव मंडपात बसलेले आहेत. ब्राह्मण नवरदेवाला लग्नानंतर काही गोष्टींचं पालन करायला सांगत आहे. ब्राह्मण नवरदेवाला सांगतो, की पुढे म्हणा आतापर्यंत तुम्हाला विचारणारं कोणीच नव्हतं. तुम्ही कुठे जाताय, कधी येताय. पण आता या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या पत्नीला सांगाव्या लागतील आणि आजपासून नियमानुसार तुम्हाला आपल्या होणाऱ्या पत्नीच्या सोबत राहावं लागेल.
  ब्राह्मणाची ही सर्व वाक्य ऐकल्यानंतर नवरदेव असं काही उत्तर देतो की ते ऐकूनच नवरीला हसू आवरत नाही. नवरदेवानं यावर उत्तर देत म्हटलं, की हे तर मी मागील सहा वर्षांपासून करत आलोय. नवरदेवाचं हे उत्तर ऐकून तिथे उपस्थित सर्वच नातेवाईक हसू लागतात. 'कोरोना लस घेणार त्याला मी फ्रीमध्ये...', पॉर्नस्टारने दिली खळबळजनक ऑफर सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. सोबतच हा व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका यूजरनं म्हटलं, या दोघांचं बॉन्डिंग खरंच फार छान आहे. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, हा व्यक्ती 'जोरू का गुलाम' आहे. याशिवायही इतरही अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडिओ witty_wedding नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर केला गेला आहे. बातमी देईपर्यंत याला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Video Viral On Social Media, Wedding video

  पुढील बातम्या