मराठी बातम्या /बातम्या /Viral /

म्हणून या महिलेने तब्बल 100 दिवस घातला एकच ड्रेस, कारण वाचून आनंद होईल

म्हणून या महिलेने तब्बल 100 दिवस घातला एकच ड्रेस, कारण वाचून आनंद होईल

कितीही कपडे खरेदी केले तरी कमीच वाटावा असा हा आजचा काळ आहे. मात्र हे एक अनोखं चॅलेंज तुम्हाला विचार करायला भाग पाडेल.

कितीही कपडे खरेदी केले तरी कमीच वाटावा असा हा आजचा काळ आहे. मात्र हे एक अनोखं चॅलेंज तुम्हाला विचार करायला भाग पाडेल.

कितीही कपडे खरेदी केले तरी कमीच वाटावा असा हा आजचा काळ आहे. मात्र हे एक अनोखं चॅलेंज तुम्हाला विचार करायला भाग पाडेल.

  • Published by:  News18 Desk

लंडन, 9 जानेवारी : मिनिमलिजम (minimalism) हा पिढीत अनेकांना 'कूल' वाटतो. मिनिमलिजम म्हणजे कमीत कमी वस्तूंचा उपयोग करत आयुष्य जगणं. अशाच मंत्राचा यशस्वी अवलंब करत सारा नावाच्या महिलेनं एक अनोखं चॅलेंज (challenge) पूर्ण केलं आहे.

या चॅलेंजमध्ये व्यक्तीनं 100 दिवस केवळ एकच ड्रेस घालणं अपेक्षित असतं. सारा रॉबिन्स (Sarah Robbins) या 52 वर्षीय महिलेनंही या चॅलेंजरुपी स्पर्धेत भाग घेत यशस्वी विजय मिळवला. तिनं यासाठी ब्रँड वूलचे (brand wool) कपडे घातले होते. या ब्रँडतर्फे ही स्पर्धा घेतली जाते. या ब्रँडच्या वेबसाईटवर दिल्यानुसार या साधासोपा पण महत्त्वाचा आहे. तो म्हणजे, लोकांना कमीतकमी गरजांमध्ये जगायला शिकवणं. या प्रकारच्या जीवनशैलीसाठी त्यांना प्रेरित करणं.

स्पर्धेच्या नियमानुसार 100 दिवस (100 days) घालण्यासाठीच्या ड्रेसला धुतलं नक्कीच जाऊ शकतं. पण केवळ तोच एक ड्रेस तुम्ही घालणं अपेक्षित असतं. सारा रॉबिन्सनं हे चॅलेंज स्वीकारण्याच्या एक दिवस आधीच इंस्टाग्रामवर फोटो टाकणं सुरू केलं. सारानं तीन महिन्यांहून जास्त काळ काळ्या मेरिनो लोकरीपासून बनलेला ड्रेस घातला.

याच ड्रेसला तिनं चर्चमध्ये घातलं. ख्रिसमस वॉकमध्येही तिनं हा ड्रेस घातला. या सुंदर पण साध्या ड्रेससोबत सारानं गरजेनुसार कधी रंगीत हिवाळी जॅकेट (winter jacket) तर कधी स्कार्फ किंवा स्कर्ट घातला. आपल्या ड्रेसिंग स्टाईलला त्यांनी रोज इंस्टाग्रामवर (Instagram) शेअर केलं. लोकांनाही ही संकल्पना खूप आवडली. पोस्टवर लोकांनी भरभरून लाईक्स देत विविध प्रतिक्रिया कमेंटसच्या माध्यमातून दिल्या.

View this post on Instagram

A post shared by SRC (@thisdressagain)

एकाच ड्रेसला कल्पकतेनं किती विविध प्रकारे विविध ऍक्सेसरीजसह घालता येऊ शकतं हे साराकडून कुणालाही शिकता येईल. तिनं ड्रेस जीन्स आणि पांढऱ्या जॅकेटसोबतही घातला. एक व्हिंटेज स्वेटरही सारावर खूप खुलून दिसत होतं. अनेक इन्स्टाग्राम युजर्सनी त्यांना चॅलेंज पूर्ण करण्यासाठी प्रेरणा आणि बळ दिलं. सारानंही सगळ्यांचं यासाठी मनापासून आभार मानले आहेत.

First published:

Tags: Instagram, London