• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • नवरा-नवरीसमोर तरुणाने केला सलमान खान स्टाईल डान्स; भावुक होत पाहुणे पाहतच राहिले, पाहा VIDEO

नवरा-नवरीसमोर तरुणाने केला सलमान खान स्टाईल डान्स; भावुक होत पाहुणे पाहतच राहिले, पाहा VIDEO

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यावर अनेक नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 • Share this:
  सोशल मीडियावर लग्नाचा मजेशीर (Marriage Funny Video) आणि हैराण करणारे व्हिडीओ (Viral Video) नेहमी व्हायरल होत असतात. विशेषत: वरात आणि लग्नादरम्यान होणाऱ्या डान्सची (Marriage Dance Video) गोष्टच काही वेगळी असते. लग्नात होणारा मजेशीर डान्सचा व्हिडीओ लोक पसंत करतात. डान्स करणारे लोकही आपल्या नृत्यात इतके मग्न होतात की त्यांना आपण काय करतोय हेदेखील कळत नाही. त्यानंतर मात्र लोक त्यांची थट्टा उडवू लागतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Viral Video on Social Media) व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण स्टेजवर नवरदेव-नवरीसमोर सलमान खानच्या गाण्यावर डान्स करीत असल्याचं दिसत आहे. लग्नात उपस्थित असलेले लोक हा डान्स पाहत आहेत. तर काहीजण याचा व्हिडीओदेखील शूट करीत आहेत. (Salman Khan style dance performed by a young man in front of bride and groom ) हा व्हिडीओ रेडिटवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, स्टेजवर नवरा-नवरी उभे आहेत. आणि आजूबाजूला बरेच लोक जमा झाले आहेत. तर स्टेजवर एक तरुण सलमान खानचं प्रसिद्ध गाणं तारो का चमकता गहना हो..या गाण्यावर बेधुंदपणे डान्स करीत आहे. तरुण डान्स करीत असताना अगदी सलमान खानच्या स्टेप्स कॉपी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचं दिसत आहे. तो नवरीकडे जाऊन तशाच अॅक्शन करतो. लोकदेखील त्याचं नृत्य आणि हावभाव पाहत आहे. हे ही वाचा-भरमंडपात नवरीने नवरदेवाला रडवलं; नेमकं काय घडलं पाहा VIDEO पाहा VIDEO... सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यावर अनेक नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलं आहे की, हा तर जुना आशिक दिसतोय.
  Published by:Meenal Gangurde
  First published: