मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO : बोलके डोळे, निरागस हसू; चाहत्यांनी लाडक्या आर्चीवर केला शुभेच्छांचा दिलखुलास वर्षाव

VIDEO : बोलके डोळे, निरागस हसू; चाहत्यांनी लाडक्या आर्चीवर केला शुभेच्छांचा दिलखुलास वर्षाव

अमिताभ बच्चन यांच्या 'झुंड' या बहुप्रतीक्षित चित्रपटातही रिंकूचा अभिनय पाहायला मिळणार आहे.

अमिताभ बच्चन यांच्या 'झुंड' या बहुप्रतीक्षित चित्रपटातही रिंकूचा अभिनय पाहायला मिळणार आहे.

अमिताभ बच्चन यांच्या 'झुंड' या बहुप्रतीक्षित चित्रपटातही रिंकूचा अभिनय पाहायला मिळणार आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 7 मार्च : रिंकू राजगुरू रसिकांना माहित झाली ती बिनधास्त आर्चीच्या रूपात. 'सैराट' या पहिल्याच चित्रपटात एकदम दमदार डेब्यू करत तिनं लाखो रसिकांची मनं जिंकली. तिचा स्वतःचा एक चाहतावर्ग तयार झाला. (actress Rinku Rajguru News)

हे चाहते आता तिच्या आगामी चित्रपटांसह तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही जाणून घ्यायला उत्सुक असतात. त्यांची उत्सुकता बरीच शमते ती सोशल मीडियावर. कारण रिंकू राजगुरू सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. (Sairat movie)

आताही रिंकूनं नुकतीच एक स्टोरी टाकली आहे. तिच्या इन्स्टापेजवर तिनं टाकलेली ही स्टोरी विशेष आहे. यात तिनं चाहत्यांना तिच्याविषयीच्या दिलखुलास कमेंट्स द्यायला सांगितल्या आहेत. चाहत्यांनीही तिच्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद दिला आहे. (Instagram Rinku Rajguru)

सुरुवातीलाच एकजण तिला 'महाराष्ट्राची क्रश' असं संबोधतो. एका चाहत्यानं लिहिलं आहे, की 'मला तुझा साधेपणा खूप आवडतो.' दुसरा एकजण लिहितो, की 'टिकटॉकवर अनेकजणं फेमस आहेत. पण आर्चीताई तुझ्यासारखी कोणीच नाही.' अजून एकानं लिहिलं आहे, 'जात महत्त्वाची नसते तर संघर्ष महत्त्वाचा असतो हे तुझ्याकडं पाहून कळतं.' (Insta story Rinku)

हेही वाचा पूजानं सांगितला पहिल्या किसिंगचा अनुभव; वडिलांनी दिला होता हा सल्ला

रिंकूनं या सगळ्या प्रतिक्रियांचा ब्लॅक अँड व्हाईट कोलाज करत एक सुंदर व्हिडिओ बनवला आहे. यात ती अतिशय साध्या लुकमध्ये दिसते आहे. पण बोलके डोळे आणि निरागस हसू यातून ती अतिशय जिवंत भाव चेहऱ्यावर आणत चाहत्यांचे आभार मानते. (fans wish Rinku Rajguru on Instagram)

हेही वाचा ‘गंगूबाई काठियावाडी’ वादाच्या भोवऱ्यात; आलिया भट्ट विरोधात आंदोलन सुरु

रिंकूनं नुकतंच लंडनमध्ये आगामी मराठी चित्रपट छूमंतरचं शूटिंग पूर्ण केलं आहे. या चित्रपटात तिच्यासह प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत असणार आहेत. या चित्रपटाचं दिगदर्शन समीर जोशी यांनी केलं आहे. प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी यांच्यासोबत रिंकू राजगुरूला पाहणं ही रसिकांसाठी मोठीच ट्रीट असणार आहे. यासह विशेष गोष्ट ही, की अमिताभ बच्चन यांच्या 'झुंड' या बहुप्रतीक्षित चित्रपटातही रिंकूचा अभिनय पाहायला मिळणार आहे. (Amitabh Bachchan zund cinema)

First published:

Tags: Instagram, Rinku rajguru