Home /News /viral /

अद्भुत! तब्बल 48 वर्षांपासून एक हात उचललेलाच, गोष्ट ऐकून व्हाल थक्क

अद्भुत! तब्बल 48 वर्षांपासून एक हात उचललेलाच, गोष्ट ऐकून व्हाल थक्क

तुम्हाला जर हात हवेत उचलून धरायला सांगितला, तर तुम्ही किती काळ तो धरू शकाल? पाच मिनिटं? एक तास? ही गोष्ट आहे एका साधू महाराजांची ज्यांनी तब्बल 48 वर्षं आपला हात हवेत उंचावला आहे.

    नवी दिल्ली, 6 डिसेंबर: भारतात एक असे साधू महाराज आहेत, ज्यांनी गेल्या तब्बल 48 वर्षांपासून (Hand raised in air) आपला एक हात हवेत उचलून धरला आहे आणि अजूनही तो खाली घेतलेला नाही. सर्वसामान्य माणसांसाठी एक हात वर उचलून धरणं ही (Difficult task) बाब काही मिनिटांसाठी शक्य होते. कुणीही आपला हात फार फार तर 15 ते 20 मिनिटं (15 to 20 mins)  हवेत उचलून धरू शकतं. त्यानंतर हातात कळ येऊ लागते, हात जड होऊ लागतो आणि नाईलाजाने तो खाली घ्यावा लागतो. मात्र एका साधूमहाराजांनी एक-दोन वर्षं नव्हे, तर तब्बल 48 वर्षांपासून आपला एका हात हवेत उंचावला आहे आणि तो अध्यापही जमिनीवर आणलेला नाही. कठोर तपश्चर्या या साधूंचं नाव आहे अमर भारती. प्रेम आणि शांततेसाठी आपलं पूर्ण आयुष्य त्यांनी वाहून घेतलं आहे. प्रसिद्धीच्या झोतापासून सतत दूर राहणाऱ्या अमर भारती यांनी एक दिवस आपला हात वर केला आणि तो तसाच ठेवला. आपण भगवान शंकराची आराधना करत असताना आपल्याला हात वर करून शांतीचा संदेश देण्याची आज्ञा आली आणि आपण हात वर केला. सुरुवातीला काही काळ वेदना झाल्या, हात खाली करावा अशी अनावर इच्छा झाली. मात्र हळूहळू या वेदना कमी होत गेल्या आणि एका काळानंतर त्या पूर्ण बंद झाल्याचं अमर भारती सांगतात. शंकराच्या प्रार्थनेमुळेच आपल्याला ही शक्ती लाभली असून जगाला शांतीचा संदेश देण्याचं काम आपण आयुष्यभर सुरूच ठेवणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हे वाचा- नो इन्फेक्शन! QR Code स्कॅन करा आणि रोबोच्या हस्ते भरपेट पाणीपुरी खा, पाहा VIDEO संसार सोडून घेतला संन्यास अमर भारती हे बँकेत नोकरीला होते. पत्नी आणि मुलांसोबत त्यांचा सुखाचा संसार सुरु होता. मात्र अचानक त्यांचा संसारातील रस संपत गेला आणि त्यांनी संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. उरलेलं आयुष्य शंकराच्या भक्तीत घालवावं, अशी खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली आणि संसाराचा त्याग केला.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Fitness, Inspiring story

    पुढील बातम्या