मुंबई, 08 फेब्रुवारी : शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर हे नाव अनेक दिवसांपासून मीडिया आणि सोशल मीडिया सर्वत चर्चेत आहे. हे दोघं खरंच एकमेकांना डेट करत्यात असा अनेकांना आता विश्वास बसायला लागला होता. पण त्यातच आणखी एका बातमीने खळबळ उडवून दिली आहे.
खरंतर आता वेलेंटाइन विक सुरु आहे आणि या विकमध्ये प्रेमी जोडपी एकत्र फिरतात, तसेच डेज सेलिब्रेट करतात. पण असं असलं तरी देखील सारा तेंडुलकरचा मात्र दुसऱ्याच तरुणासोबत फोटो समोर आला आहे. जे पाहून चाहत्यांना दुखं झालं आहे.
हे ही पाहा : Sara Tendulkar चे पार्टीतील फोटो व्हायरल, मात्र चर्चा रंगली 'त्या' मिस्ट्री बॉयची
या फोटोमधील तरुण कोण आणि सारा त्याच्या इतक्या जवळ कशी? साराला नक्की काय सांगायचंय? असे अनेक प्रश्न या फोटोमुळे उपस्थीत झाले. पण हा व्हायरल झालेला फोटो तसा जुना आहे.
या फोटोमधील तरुण हा सिद्धार्थ केरकर असल्याचं सांगितलं जातंय . IPL 2022 मध्ये सिद्धार्थ आणि सारा एकत्र दिसले होते. चाहत्यांनाही या दोघांची जोडी खूप आवडली होती. मात्र नंतर ही एक अफवा असल्याचं समोर आलं.
सिद्धार्थ हा साराचा मित्र आहे. हे दोघे अनेकदा एकमेकांसोबत हँग आउट करतात. असे म्हटले जात आहे की शुभमन गिलच्या आधी सारा बहुतेक सिद्धार्थसोबत दिसली होती. मात्र, तिने सिद्धार्थसोबतचे नाते कधीच उघड केले नाही. पण या दोघांमध्ये खूप घट्ट मैत्री आहे.
तसेच शुभमन आणि सारा यांच्यातील खरं नातं अजूनही समोर आलेलं नाही. शिवाय यावर कोणीच अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.
सारा तेंडुलकरला नुकतच इंस्टाग्रामवर याबद्दल विचारलं गेलं तेव्हा ती म्हणाली, ''होय! मी अविवाहित आहे भविष्यात काही काळासाठी माझी अशी कोणतीही योजना नाही.'' तिचं हे वक्तव्य अजूनतरी ती सिंगल असल्याचंच सांगत आहे.
खरंतर सारा काही ठरावीक तरुण क्रिकेटर्सना सोशल मीडियावर फॉलो करते आणि शुभमन त्यांपैकीच एक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sachin tendulkar, Social media, Top trending, Videos viral, Viral