199 वेळा दंड न भरल्याने पोलिसांनी Lamborghini केली जप्त! इन्स्टाग्राम स्टारला भोवला बेजबाबदारपणा

199 वेळा दंड न भरल्याने पोलिसांनी Lamborghini केली जप्त! इन्स्टाग्राम स्टारला भोवला बेजबाबदारपणा

एक नाही दोन नाही तब्बल 199 चालान थकवलेले आणि तेही प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या लॅम्बोर्गिनीच्या (Lamborghini) कार मालकीणीने. मग काय शेवटी पोलिसांनी या सोशल माडिया स्टार महिलेची लॅम्बोर्गिनी कार थेट उचलली आणि पोलीस वाहतूक विभागात घेऊन गेले.

  • Share this:

मॉस्को, 17 एप्रिल : बेदकारपणे वाहने चालवणे, वाहतूकीचे नियम मोडणे याबद्दल अनेकांना काहीच वाटत नाही. त्यांना अशाप्रकारे स्टंट केल्यानंतर आनंद मिळत असावा. मात्र, अशा पद्धतीने नियम मोडल्याचा फटका एका इन्फ्लुएन्सरला सहन करावा लागला आहे. ही बातमी आहे रशियामधील (Russia), एक नाही दोन नाही तब्बल 199 वेळा दंडाची रक्कम (Challan) देणं चुकवल्यामुळे या कार मालकिणीला मोठा फटका सहन करावा लागला आहे. तेही प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या लॅम्बोर्गिनीच्या (Lamborghini) कार मालकीणीला असा दंड द्यावा लागल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पोलिसांनी या सोशल माडिया स्टार महिलेची लॅम्बोर्गिनी कार थेट उचलली आणि पोलीस वाहतूक विभागात घेऊन गेले. ही महिला वारंवार गुन्हा करूनही त्यासाठी दंडही भरत नव्हती, त्यामुळे पोलिसांना हे पाऊल उचलावे लागले आहे.

View this post on Instagram

A post shared by НАСТЯ ИВЛЕЕВА (@_agentgirl_)

इंडिया टाईम्सच्या वृत्तानुसार, नास्त्या इव्हलिवा (Nastya Ivleeva) ही एक ब्लॉगर आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 10 कोटी 80 लाख फॉलोअर्स आहेत. तिने पूर्वी वाहतुकीचे नियम मोडले होते आणि त्याचा दंडही भरला नव्हता, त्यामुळे पोलीस तिची गाडी उचलून घेऊन गेले. Ivleeva इव्हिलीवा ही मॉस्कोची राहणारी आहे.

गेल्या वर्षभरात तिला वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल 199 वेळा दंडाची पावती मिळाली. तिची कार Lamborghini Aventador होती. या कारची किंमत सुमारे 1 कोटी 94 लाख एवढी आहे. तिचे इतके चाहते आहेत, समाजामध्ये तिला फॉलो करणारा मोठा वर्ग आहे, असे असल्यामुळे या कृतीबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

(हे वाचा - एका सलमानमुळं बदललं दुसऱ्या सलमानचं आयुष्य; संघर्ष ऐकून भाईजानही भावुक)

माझी कार माझ्याकडून प्रथमच काढून घेण्यात आली आहे.दंडाची रक्कम भरून इव्हिलीवाने वाहतूक विभागाकडून गाडी परत मिळवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वेगात गाडी चालवणे, लाइन क्रॉस करणे आणि बेकायदेशीर वळणे घेणे यासाठी तिच्यावर दंड आकारण्यात आला होता. .

Published by: News18 Desk
First published: April 17, 2021, 4:11 PM IST

ताज्या बातम्या