मॉस्को, 09 नोव्हेंबर : सामन्याआधी मानसिक ताण कमी करण्यासाठी खेळाडू वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करतात. मात्र एक आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू चक्क सामन्याआधी हस्तमैथुन (Masturbate) करत होता. त्याचा एक व्हिडीओही ऑनलाइन प्रसारित झाला होता. मुख्य म्हणजे हा खेळाडू संघाचा कर्णधाक होता. रशियाचा फुटबॉल संघाचा कर्णधार आर्टेम डिज्युबाला या प्रकरणी संघातून वगळण्यात आलं आहे. या खेळाडूवरती किती सामन्यांची बंदी असणार आहे, याबाबत माहिती देण्यात आलेली नाही आहे.
डेली मेलनं दिलेल्या वृत्तानुसार, रशियाचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक स्टॅनिस्लाव्ह चेरचेसोव्ह यांनी आता पुष्टी केली आहे की मोल्डोव्हा, तुर्की आणि सर्बियाविरुद्धच्या आगामी सामन्यांसाठी ते कर्णधार डिज्युबाशिवाय मैदानात उतरतील.
वाचा-VIDEO : सराफाची नजर चुकवून महिलेनं लंपास केली चैन, चोरीचा थरार CCTVमध्ये कैद
वाचा-15 सेकंदात टायगर झाल्या 4 मुली, वाचून आश्चर्य वाटत असेल तर पाहा VIDEO
याआधी सनने दिलेल्या वृत्तानुसार, डिज्युबाच्या मॅनेजरनं सांगितले की. 'डिज्युबानं जे केले त्याचा रशियाच्या राष्ट्रीय संघाशी काहीही संबंध नाही. हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळे या प्रकरणात कोणतीही माहिती देण्याची गरज नाही". दरम्यान रशियन संघाने आगामी मोल्दोव्हा, तुर्की आणि सर्बिया दौऱ्यासाठी खेळाडूंचे लक्ष केवळ खेळाकडे असले पाहिजे, असे सांगत ही कारवाई केल्याची माहिती दिली.