भयंकर! भरधाव वेगात आला ट्रक अन् एक क्षणात चिरडल्या 5 गाड्या, CCTV VIDEO आला समोर

भयंकर! भरधाव वेगात आला ट्रक अन् एक क्षणात चिरडल्या 5 गाड्या, CCTV VIDEO आला समोर

एखाद्या सिनमेसारखा स्टंट वाटेल पण हे खरं घडलं आहे, असा भयंकर अपघात तुम्ही कधीच पाहिला नसेल.

  • Share this:

मॉस्को, 02 जुलै : रशियामध्ये (Russia) असा एक भीषण अपघात झाला आहे ज्याचा व्हिडrओ सोशल मीडियावरही खूप व्हायरल होत आहे. रशियाच्या चेल्याबिन्स्कमधील (Chelyabinsk) उरल महामार्गावर एका ट्रकनं तब्बल 5 ते 6 गाड्यांना चिरडलं. वेगात येणाऱ्या या ट्रकचा अचानक ताबा सुटला आणि महामार्गावरील सर्व गाड्या चिरडल्या गेल्या. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघतात 2 लोकांचा जागीच मृत्यू झाला तर 7 लोक गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे.

RTच्या वृत्तानुसार, ही भयानक घटना एम -5 उरल महामार्गावर 16 जून रोजी घडली. ट्रक चालकाच्या म्हणण्यानुसार तो खूप वेगात गाडी चालवत होता. अचानक गाडीवर ताबा सुटला, त्यानं ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला ब्रेक लावता आला नाही. ट्रक चालकाच्या म्हणण्यानुसार, पुढे ट्रॅफिक जाम असल्याचे त्याला ठाऊक नव्हते, रस्ता रिकामा आहे असा त्याचा विचार करून तो ट्रक वेगात चालवत होता.

वाचा-VIDEO - बकरीसाठी तरुणाने बोअरवेलमध्ये टाकलं डोकं, मित्रांनी पकडले पाय आणि...

वाचा-तरुणाच्या हातात केळं पाहून अंगावर आला सरडा, श्वास रोखून ठेवणारा VIDEO VIRAL

CCTV कॅमेऱ्यात कैद झाला खतरनाक अपघात

महामार्गावरील कॅमेऱ्यात हे स्पष्टपणे दिसून येत आहे की, ट्रकचालकानं ब्रेक लावला नाही. त्यामुळं समोर उभे असलेल्या अनेक वाहनांना चिरडले. या घटनेत 5 कार आणि इतर अनेक सार्वजनिक वाहनांचेही नुकसान झाले आहे.

वाचा-'जरा जरा टच मी' गाण्यावर करत होती Tiktok; मागून आला कुत्रा आणि... पाहा VIDEO

संपादन-प्रियांका गावडे.

First published: July 2, 2020, 2:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading