मराठी बातम्या /बातम्या /Viral /थरारक! चालत्या वॅगन आरनं घेतला पेट, आगीतूनच ड्रायव्हरनं मारली बाहेर उडी पण...

थरारक! चालत्या वॅगन आरनं घेतला पेट, आगीतूनच ड्रायव्हरनं मारली बाहेर उडी पण...

कारला लागलेली आग इतकी भयंकर होती की काही मिनिटातच गाडी जळून खाक झाली.

कारला लागलेली आग इतकी भयंकर होती की काही मिनिटातच गाडी जळून खाक झाली.

कारला लागलेली आग इतकी भयंकर होती की काही मिनिटातच गाडी जळून खाक झाली.

पानीपत, 14 ऑक्टोबर : देव तारी त्याला कोण मारी, अशी म्हण मराठीत प्रचलित आहे. काही काही वेळा एखाद्या माणसाचा काळ आलेला असतो पण वेळ आली नसती. असाच काहीसा प्रकार हरियाणाताली पानीपत येथे घडला. एका चालत्या गाडीला आग लागव्यानंतरही त्याचा ड्रायव्हर थोडक्यात बचावला.

पानीपतच्या अनाजमंडी येथील व्हॅगनआर गाडीनं अचानक पेट घेतला. मात्र ड्रायव्हरनं प्रसंगवधान दाखलत गाडीतून बाहेर उडी मारली, आणि स्वत:चा जीव वाचवला. गाडीला आग लागल्याची माहिती स्थानिकांनी लगेचच अग्निशमन दलाला दिली.

वाचा-अमानुषतेचा कळस! कुत्र्याला मारहाण करतानाचा आणखी एक VIDEO समोर

वाचा-थेट मगरींसहच अंघोळ करण्याची डेअरिंग; VIDEO पाहा समजेल मग पुढे काय झालं

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, चालकानं दिलेल्या माहितीनुसार, गाडी दुरुस्तीसाठी घेऊन जात असतानाच हा अपघात झाला. ड्रायव्हर गाडी घेऊन वर्कशॉपला घेऊन जात होता. त्याचदरम्यान रस्त्यातच गाडीनं पेट घेतला.

वाचा-पकडलं खरं पण आता चलन कशाचं कापायचं? गाडी पाहून वाहतूक पोलिसांनाही पडला प्रश्न

दरम्यान, या कारला लागलेल्या आगीमुळे महामार्गावर काही काळ ट्रॅफिकही जाम होता. कारला लागलेली आग इतकी भयंकर होती की काही मिनिटातच गाडी जळून खाक झाली. गाडीला आग का लागली, याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही आहे.

First published: