नवी दिल्ली 12 ऑगस्ट : लग्नात प्रत्येकाला आपल्या आवडीचा ट्रेडिशनल ड्रेस (Traditional Dress) घालण्याची इच्छा असते. नवरी आणि नवरदेव (Bride and Groom) आपल्या पारंपारिक वेशभूषेनं सर्वांचंच मन जिंकून घेतात. याच कारणामुळे बहुतेकदा नवरदेव एखाद्या राजाप्रमाणे तर नवरी महाराणीप्रमाणे लुकमध्ये दिसतात. सोशल मीडियावर सध्या एका लग्नातील असाच व्हिडिओ व्हायरल (Wedding Video Viral) होत आहे. या व्हिडिओमध्ये नवरदेव आणि नवरी आपल्या ड्रेसनं सर्वांचं लक्ष वेधत आहेत. अशातच नवरदेवानं स्टेजवर असं काही केलं, ज्यानं सर्वांचंच मनं जिंकलं.
घटम्, वीणा, गिटारच्या सुरात 'है अपना दिल तो आवारा'; ऐकतंच रहावंसं वाटेल हे गाणं
सोशल मीडियावर व्हायरल (Viral on Social Media) होणाऱ्या या व्हिडिओमध्ये दिसतं, की नवरदेव आणि नवरी स्टेजवर उभा असतात. या ठिकाणी त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यही उभे असतात. वरमाळेचा कार्यक्रम सुरू होताच नवरदेव गुडघ्यावर नवरीसमोर बसतो आणि नवरीसमोर झुकतो. हे पाहून तिथे उपस्थित असलेले लोक टाळ्या वाजवू लागतात. इतकंच नाही तर हे पाहून नवरीदेखील आनंदी होते आणि हसत-हसत ती नवरदेवाच्या गळ्यात वरमाळा घालते.
View this post on Instagram
हुबेहूब आईसारखी अॅक्टिंग करत चिमुकलीनं वेधलं लक्ष; VIDEO पाहून पोट धरून हसाल
नवरदेव आणि नवरीची ही जोडी सर्वांच्याच पसंतीस उतरत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर प्रियांका नावाच्या यूजरनं हा व्हिडिओ शेअर केला आहे. हजारो लोकांनी व्हिडिओ लाईक केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत याला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलं गेलं आहे, ' ड्रीम, लव्ह, हॅपीनेस, टू गेदर फॉरएवर'. या व्हिडिओवर कमेंट करत अनेक यूजर्सनी या जोडप्याचं कौतुक केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bridegroom, Video Viral On Social Media, Wedding video