मराठी बातम्या /बातम्या /Viral /नवरीसाठी स्टेजरवरच केलं हे काम; नवरदेवानं जिंकली सगळ्यांची मनं, पाहा खास Wedding Video

नवरीसाठी स्टेजरवरच केलं हे काम; नवरदेवानं जिंकली सगळ्यांची मनं, पाहा खास Wedding Video

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये (Wedding Video Viral) दिसतं की स्टेजवर उभा असलेला नवरदेव अतिशय उंच आहे. इतक्यात नवरीबाई त्याला वरमाळा घालण्यासाठी स्टेजवर येते.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये (Wedding Video Viral) दिसतं की स्टेजवर उभा असलेला नवरदेव अतिशय उंच आहे. इतक्यात नवरीबाई त्याला वरमाळा घालण्यासाठी स्टेजवर येते.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये (Wedding Video Viral) दिसतं की स्टेजवर उभा असलेला नवरदेव अतिशय उंच आहे. इतक्यात नवरीबाई त्याला वरमाळा घालण्यासाठी स्टेजवर येते.

नवी दिल्ली 28 सप्टेंबर : नवरी आणि नवरदेव (Bride and Groom) लग्नात (Marriage) सर्वांचंच लक्ष वेधून घेत असतात. लग्नात आलेल्या सर्वच पाहुण्यांच्या नजरा त्यांच्याकडेच असतात. नवरदेव आपली वरात घेऊन नवरीच्या दारात येतो. मात्र, नवरीबाई या खास दिवशी तयार होण्यासाठी भरपूर वेळ घेते. दोघंही जेव्हा स्टेजवर येतात तेव्हा त्यांची जोडी पाहण्यासारखी असते. अनेकदा नवरी आणि नवरदेवाच्या उंचीमध्ये मात्र बराच फरक असतो. यामुळे वरमाळेच्या कार्यक्रमावेळी अनेकदा मस्ती आणि मस्करी होताना दिसते.

खेळता-खेळता घसरला अन् थेट दगडावर जाऊन आदळला; चिमुकल्याचा VIDEO होतोय व्हायरल

असंच काहीसं सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये (Wedding Video Viral) पाहायला मिळतं. यात दिसतं की स्टेजवर उभा असलेला नवरदेव अतिशय उंच आहे. इतक्यात नवरीबाई त्याला वरमाळा घालण्यासाठी स्टेजवर येते. वरमाळेचा कार्यक्रम सुरू होताच आधी नवरी समोर येते. ती नवरदेवाच्या गळ्यात वरमाळा घालण्यासाठी बराच वेळ प्रयत्न करते. मात्र, नवरदेव उंच असल्यानं तिला हे शक्य होत नाही. पण पुढे नवरदेव जे काही करतो त्यानं सगळ्यांचंच मन जिंकलं.

हा नवरदेव स्टेजवरच नवरीसमोर गुडघ्यावर बसला. यानंतर नवरीनं अगदी आनंदात त्याच्या गळ्यात वरमाळा घातली. नवरी आणि नवरदेवाची ही बॉण्डिंग पाहून कोणीही आनंदी होईल. नवरदेव गुडघ्यावर बसल्याचं बसल्याचं पाहून नवरीच्या चेहऱ्यावरील हसू आणखीच वाढतं. सोशल मीडियावरील हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.

हिरे अन् सोन्यापेक्षाही महाग आहे हे लाकूड; 1 ग्रॅमची किंमत ऐकून व्हाल अवाक

इन्स्टाग्रामवर शायस्टाइल्स माय डॉल नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ एक लाखहून अधिकांनी पाहिला आहे. हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं गेलं आहे, की माझा सगळ्यात आवडता सीन. या व्हिडिओवर अनेक यूजर्सनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

First published:
top videos

    Tags: Bridegroom, Wedding video