Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /Viral /

हत्तीने हत्तीणीला केलं अनोख्या अंदाजात प्रपोज; प्राण्यांचा कधीही पाहिला नसेल असा Romantic Video

हत्तीने हत्तीणीला केलं अनोख्या अंदाजात प्रपोज; प्राण्यांचा कधीही पाहिला नसेल असा Romantic Video

व्हिडिओमध्ये दिसतं की हत्ती एखाद्या मनुष्याप्रमाणे आपल्या प्रेयसीला प्रपोज (Elephant Proposal Video) करण्यासाठी गुलाबी रंगाचा पुष्पगुच्छ आपल्या सोंडेत घेऊन येतो.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 22 नोव्हेंबर : इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमधील काही व्हिडिओ असेही असतात जे लोक अतिशय प्रेमाने बघतात. असाच एक अतिशय खास व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हत्तीची एक जोडी पाहायला मिळते. यात एक हत्ती सोंडेमध्ये फुलं घेऊन आपल्या हत्तीणीला प्रपोज (Elephant Proposal Viral Video) करण्यासाठी निघालेला दिसतो. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.

प्राण्यांचा समजदारपणा आणि त्यांचं अनोख स्किल या लिस्टमध्ये व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमधील (Wildlife Videos) हा सुंदर व्हिडिओ सर्वांचंच मन जिंकत आहे. व्हिडिओ पाहून सगळेच हत्तीच्या समजदारपणाचं आणि प्रेम व्यक्त करण्याच्या त्याच्या स्टाईलचं कौतुक करत आहेत. नेटकरी या हत्तीवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. हा व्हिडिओ तुम्हीही एकदा नक्की बघा.

व्हिडिओमध्ये दिसतं की हत्ती एखाद्या मनुष्याप्रमाणे आपल्या प्रेयसीला प्रपोज (Elephant Proposal Video) करण्यासाठी गुलाबी रंगाचा पुष्पगुच्छ आपल्या सोंडेत घेऊन येतो. तो आपल्या हत्तीणीजवळ जाऊन तिला प्रपोज करतो आणि हा गुच्छ देतो. हत्तीणही त्याचं प्रपोजल अतिशय प्रेमाने स्वीकारते आणि दोघंही एकमेकांप्रतीचं प्रेम दर्शवतात. हा व्हिडिओ पाहून तुमच्या चेहऱ्यावरही हसू येईल. प्राण्यांकडे इतकी हुशारी कशी येते, असा प्रश्न तुम्हालाही पडेल.

View this post on Instagram

A post shared by (@elephantsofworld)

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर Elephantsofworld नावाच्या पेजवरुन शेअर कऱण्यात आला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. व्हिडिओला जवळपास दीड लाख लाईक्स मिळाले आहेत. इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही हा व्हिडिओ शेअर केला जात आहे. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी आपल्या भावना मांडल्या आहेत. काही यूजर्सनी लिहिलं की इतका प्रेमळ व्हिडिओ त्यांनी याआधी कधीच पाहिला नाही. एका यूजरने तर हेदेखील म्हटलं की हत्तीणीची अदा अतिशय सुंदर आहे आणि प्रपोजल स्वीकरण्याची तिची पद्धतही अतिशय खास आहे.

First published:

Tags: Elephant, Video Viral On Social Media