मराठी बातम्या /बातम्या /Viral /मित्राचा जीव वाचवून बनला हिरो, 2 सेकंद उशीर झाला असता... पाहा थरारक अपघाताचा व्हिडीओ

मित्राचा जीव वाचवून बनला हिरो, 2 सेकंद उशीर झाला असता... पाहा थरारक अपघाताचा व्हिडीओ

अपघाताचा व्हिडीओ

अपघाताचा व्हिडीओ

मित्र असावा तर असा, एका सेकंदात तो निर्णय घेतला नसता, तर तरुण जिवंत नसता, थरारक Video

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : रस्ते अपघाताचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. हे अपघात खरोखरंच अंगावर काटा आणणारे असतात. कधी ड्रायव्हरच्या स्वत:च्या चुकीमुळे हे अपघात होतात, तर कधी इतरांच्या चुकीमुळे हे अपघात होतात. म्हणूनच चालताना तसेच गाडी चालवताना रत्यावर सगळ्या बाजूने लक्ष ठेवणे जास्त गरजेचं आहे.

यासंदर्भात एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो पाहून नक्कीच तुमच्या हृदयाचा ठोका चुकेल. या व्हिडीओत तुमच्या लक्षात येईल की सेकंदाची किंमत काय असते, तसेच वेळेवर घेतलेला एक निर्णय कसं कोणाचं आयुष्य बदलू शकतं.

तो मरणार हे त्याला एक दिवस आधीच ठावूक होतं? दुसऱ्या दिवशी घराबाहेर पडला आणि...

गा व्हायरल व्हिडिओ ट्विटरवर @HasnaZarooriHai नावाच्या वापरकर्त्याने शेअर केला आहे आणि आतापर्यंत त्याला लाखो वेळा पाहिलं गेलं आहे.

हा व्हायरल व्हिडीओ व्यस्त रस्त्याचा आहे. या रस्त्यावरुन वेगाने गाड्या धावत आहेत, तर दोन मित्र एकमेकांशी बोलत चालत जात आहेत. तेव्हाच रस्त्यावर एका कंटेनर ट्रकचा अपघात झाला आणि हा ट्रक आडवा झाला. पण हा ट्र अशा पद्धतीने खाली पडला की तो तेथे जवळच असलेल्या व्यक्तीवर पडला असता. पण त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या मित्राच्या हे लक्षात आलं आणि त्याने आपल्या मित्राला मागे ओढलं.

मित्राच्या योग्यवेळी घेतलेल्या निर्णयामुळे एका तरुणाचे प्राण थोडक्यात बचावले आहे. नाहीतर त्या तरुणाचे काय झाले असते हे वेगळं सांगायला नको.

हा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटीझन्सनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी या तरुणाचं नशीब चांगलं असल्याचं सांगितलं आहे. तर काहींनी त्याला चांगला मित्र मिळाला असल्याचं सांगितलं आहे.

या व्हिडीओला एक उदाहरण म्हणून घ्या आणि रस्त्यावरुन चालताना किंवा गाडी चालवताना नेहमी सतर्क रहा.

First published:
top videos

    Tags: Shocking, Shocking video viral, Social media, Top trending, Videos viral, Viral