VIDEO : एकाच ठिकाणी दोन वेळा धडकल्या दुचाकी; मृत्यूच्या दाढेतून थोडक्यात बचावले तरुण

VIDEO : एकाच ठिकाणी दोन वेळा धडकल्या दुचाकी; मृत्यूच्या दाढेतून थोडक्यात बचावले तरुण

रस्त्यावर मध्येच ठेवण्यात आलेल्या पाईपलाइनमुळे अशा दुर्घटना आणि अपघात घडत असल्याचं समोर आलं आहे.

  • Share this:

जींद, 28 ऑगस्ट : हैदराबादमधील दुचाकीस्वारानं वेगावर नियंत्रण न ठेवल्यानं डिव्हायडरला धडकून भीषण अपघात झाल्याची घटना समोर आल्यानंतर आणखीन एक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एकाच ठिकाणी दोन भीषण अपघात झाले आहेत. या अपघातामध्ये थोडक्यात मोठी जीवितहानी टळली आहे.

हरियाणाच्या जींद जिल्ह्यात रोहतक रोडवर दररोज अपघात होत आहेत आणि अमृत योजनेंतर्गत गटाराच्या पाईप्समुळे हा अपघात होत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. या रस्त्यावर दोन दुचाकीचे अपघात झाल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

हे वाचा-सिलिंडरसोबत सापाचीही होम डिलिव्हरी, VIDEO पाहून व्हाल हैराण

रस्त्यावर मध्येच ठेवण्यात आलेल्या पाईपलाइनमुळे अशा दुर्घटना आणि अपघात घडत असल्याचं समोर आलं आहे. या पाईपलाइन्स हटवण्याची स्थानिकांनी विनंती करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष केलं जात असल्याचं दावा स्थानिकांनी केला आहे.

महाराष्ट्रात पिकअप आणि टेम्पोची भीषण धडक झाली. पुण्यातील जुन्नरमध्ये झालेल्या या भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला त्यानंतर आणखीन एक भीषण अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 28, 2020, 4:18 PM IST
Tags: hariyana

ताज्या बातम्या