VIDEO: परफेक्ट सेल्फीचा नाद भोवला, नदीला आलेल्या पुरात अडकल्या विद्यार्थिनी

VIDEO: परफेक्ट सेल्फीचा नाद भोवला, नदीला आलेल्या पुरात अडकल्या विद्यार्थिनी

खाली उतरण्याचे किंवा पाण्यातून पलिकडे जाण्याचं धाडस जीवावर बेतू शकतं याचा अंदाज त्यांना एव्हाना आला होता.

  • Share this:

छिंदवाडा, 24 जुलै: अनेक दुर्घटना घडूनही आणि फोटीचा नाद जीवावर बेतण्याच्या अनेक घटना आजूबाजूला घडत असूनही सेल्फी काढण्याचा नाद काही कमी होत नाही. नदीच्या मध्यभागी उभं राहून सेल्फी काढण्याची हौस दोन तरुणींना चांगलीच महागात पडली आहे. त्यावेळी स्थानिक आणि पोलिसांच्या मदतीनं या दोन्ही तरुणींचा जीव थोडक्यात वाचला आहे.

परफेक्ट सेल्फी काढण्याच्या नादात या दोन्ही तरुणी नदीपात्रात मध्यभागी उभ्या होत्या. पाण्याचा प्रवाह वाढल्यानं त्या अडकल्या आणि प्रवाहाचा वेग जास्त असल्यानं त्यांना नदी ओलांडणं कठीण झालं. या दोन तरुणींच्या मैत्रिणी नदी किनाऱ्यावर उभ्या होत्या. त्यांनी पाणी वाढत असल्याचं पाहून तातडीनं पोलीस प्रशासनाला माहिती दिली.

नदीच्या मध्यभागी अडकलेल्या दोन्ही तरुणींचे पाय लटपटायला लागेल. चारही बाजूनं पाण्यानं वेढलेल्या दगडावर या दोघी उभ्या होत्या. खाली उतरण्याचे किंवा पाण्यातून पलिकडे जाण्याचं धाडस जीवावर बेतू शकतं याचा अंदाज त्यांना एव्हाना आला होता.

हे वाचा-VIDEO : एक्स बॉयफ्रेंडचा बदला घेण्यासाठी तरुणीनं जाळली कार आणि...

घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल होईपर्यंत पाणी आणखीन वाढलं होतं. पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीनं काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर अडकलेल्या दोन तरुणींना नदीबाहेर काढण्यात यश आलं आहे.

ही संपूर्ण घटना मध्य प्रदेशातील छिंदवाडा परिसरात घडली आहे. तिथे कॉलेजमधील विद्यार्थी पिकनिकसाठी गेले होते. त्यावेळी दोन तरुणी सेल्फीच्या नादात नदीमध्ये गेल्या परफेक्ट सेल्फी यावा म्हणून नदीपात्रातील एका दगडावर त्या उभ्या राहिल्या आणि हा संपूर्ण प्रकार घडला.

Published by: Kranti Kanetkar
First published: July 24, 2020, 2:14 PM IST

ताज्या बातम्या