मराठी बातम्या /बातम्या /Viral /

चिडलेल्या मांजरीनं केला रिंग मास्टरवर हल्ला, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

चिडलेल्या मांजरीनं केला रिंग मास्टरवर हल्ला, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

सर्कसमध्ये नेमकं असं काय घडलं की मांजरानं चिडून थेट रिंग मास्टरवर हल्ला केला, पाहा VIDEO

सर्कसमध्ये नेमकं असं काय घडलं की मांजरानं चिडून थेट रिंग मास्टरवर हल्ला केला, पाहा VIDEO

सर्कसमध्ये नेमकं असं काय घडलं की मांजरानं चिडून थेट रिंग मास्टरवर हल्ला केला, पाहा VIDEO

  • Published by:  Akshay Shitole

मुंबई, 27 फेब्रुवारी : एका मांजरीनं रागाच्या भरात तरुणावर हल्ला केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. साउथ ओसेटिया इथल्या तकशिनवली शहरातील हा व्हिडिओ असल्याची माहिती मिळत आहे. सर्कसमधील कार्यक्रमादरम्यान एका जंगली मांजरीनं रिंग मास्टरवर हल्ला केल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं आहे.

अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहून शकता की मांजराला सर्कसमधील कार्यक्रमात रस नसतानाही जबरदस्तीनं रिंग मास्टर त्या मांजरीला करामती करण्यासाठी भाग पाडत होता. त्याच वेळी एक छोटा अपघात झाला आणि मांजर खाली पडली. चिडलेल्या मांजरीने आपला रौद्र रूप धारण करत दोन्ही पंजांनी रिंग मास्टरवर हल्ला केला.

@chapoisatUn lince ataca a su adiestrador en un circo en plena actuaciónUn lince de un circo de Tsjinval, capital de la República de Osetia del Sur. ♬ sonido original - chapoisat

@chapoisatGato se roba el show en un concierto de música clásica, Turquía ♬ sonido original - chapoisat

हेही वाचा-गर्दीच्या असलेल्या रस्त्यावर फिरतेय शीर नसलेली व्यक्ती, धक्कादायक VIDEO VIRAL

हा व्हिडिओ सोशल मीडियावर युझर्सनी मोठ्या प्रमाणात शेअर केला आहे. तर मांजर प्रेमींनी रिंग मास्टरला दोष देत मांजरीच्या वागण्याचं समर्थन केलं आहे. मांजरीनं हल्ला केल्यानंतर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रेक्षक जोरात ओरडले. मांजरीला रिंग मास्टरच्या अंगावरून खाली उतरवण्यात आलं. तिथल्या स्थानिक मीडियाने दिलेल्या वृत्तनुसार मंज आणि प्रेक्षकांमध्ये जास्त अंतर नव्हतं त्यामुळे चिडलेल्या मांजरीनं प्रेक्षकांवर हल्ला चढवला असता तर मोठा अनर्थ घडू शकला असता.

तर या व्हिडिओसोबतच आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. कॉन्सर्टमध्ये घुसलेली मांजर सगळ्यांच्या पायत घुटमळताना दिसत आहे. सर्वजण या मांजरीला मंचावरून खाली उतरवण्याचा प्रयत्न करतात मात्र ती कुणालाही न जुमानता पुन्हा स्टेजवर कार्यक्रमात लुडबुड करण्यासाठी येताना दिसत आहे. हे दोन्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हेही वाचा-रोमँटिक डेटमध्ये चोराची एंट्री, बंदूक उगारत चोराच्या मागे धावलं पोलीस दाम्पत्य

First published:

Tags: Social media, Tik tok, Viral, Viral video.