मुंबई, 05 जुलै : फिल्ममध्ये हिरो ज्यापद्धतीने वाऱ्याच्या वेगाने सुसाट बाईक चालवतो किंवा बाईकवर स्टंट करतो, ते पाहून प्रत्यक्षातही बरेच तरुण अशी हिरोगिरी करायला जातात. एखादी तरुणी समोर दिसली किंवा बाईकवर पाठीमागे एखादी तरुणी बसली असली की तिला इम्प्रेस करण्याच्या नादात बाईकवर अशी स्टाईल मारतात
(Bike collided with scooty). पण ही हिरोगिरी किती महागात पडू शकते, हेच दाखवून देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे
(Bike accident video viral).
एक तरुण आपल्या गर्लफ्रेंडसोबत बाईक चालवत होता. त्याने बाईकचा स्पीड इतका ठेवला होता की भयंकर दुर्घटना झाली. तरुण आणि त्याच्यासोबत बसलेली तरुणी दोघंही हवेत उडाले. इतकंच नव्हे तर या बाईकमुळे एका स्कूटीचालकाचाही अपघात झाला. अपघाताची ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडीओ पाहून तुम्हालाही धडकी भरेल.
हे वाचा - बापरे! बुल्डोझरला लटकून गरागरा फिरताना फुटली कवटी, कॅमेऱ्यात कैद झाली भयंकर दुर्घटना; VIDEO VIRAL
व्हिडीओत पाहू शकता एक तरुण वेगाने बाईक चालवतो आहे. त्याची बाईक थांबते ती एका स्कुटीला धडकल्यानंतरच. दुसऱ्या एका बाजूने स्कुटी येत असते या स्कूटीलाच ही बाईक धडकते. एकमेकांना धडकताच स्कूटी आणि बाईक दोन्ही दूरवर जाऊन कोसळतात. अपघात पाहता दोघांनाही गंभीर दुखापत झालीच असावी असं दिसून येतं.
तुम्ही व्हिडीओ नीट पाहाल तर फक्त बाईकस्वाराचीच नव्हे तर स्कूटीचालकाचीही चुकी असल्याचं दिसतं आहे. जिथं बाईकस्वार वाऱ्याच्या वेगाने बाईक पळवत होता तिथं स्कूटीस्वार नीट लक्ष देताच रोड क्रॉस करत होता.
हे वाचा - बापरे! शेकडो फूट उंचावर चिमुकलीचा Dangerous Stunt; काळजाचा ठोका चुकवणारा Video
इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. अनेकांनी या चालकांना सुनावलं आहे. तर काहींनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.