मराठी बातम्या /बातम्या /Viral /विना हेल्मेट बाईकवर रील बनवणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल; दंड पाहून फुटेल घाम

विना हेल्मेट बाईकवर रील बनवणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल; दंड पाहून फुटेल घाम

विना हेल्मेट बाईकवर रील बनवणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल

विना हेल्मेट बाईकवर रील बनवणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल

चालत्या दुचाकीवर हेल्मेट न घालता मोटारसायकल चालवणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Madhya Pradesh, India

    गाझियाबाद, 23 जानेवारी : रस्त्यावर प्रवास करताना वाहतुकीच्या नियमांचं पालन करणं आवश्यक असते. काही वाहनचालक या नियमांकडे दुर्लक्ष करताना दिसतात. अशा वेळी पोलीस त्यांच्यावर कारवाई करतात. अलीकडच्या काळात रस्त्यावर वाहन चालवताना स्टंट करणं, मद्यपान करून वाहन चालवणं, नियमांचं उल्लंघन करणं, सोशल मीडियावर व्हिडिओ रील्स शेअर करण्यासाठी वेगात वाहनं चालवणं, रेसिंग यासारखे प्रकार घडताना दिसतात. सोशल मीडियामुळे या गोष्टींचं प्रमाण निश्चितच वाढलं आहे. वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करून वाहनं चालवणं प्रसंगी जिवावर बेतू शकतं हे माहिती असूनही सोशल मीडियावर लोकप्रिय होण्यासाठी तरुण-तरुणी असे प्रकार करतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात एक युवक वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करून विनाहेल्मेट बाइक चालवत मद्यपान करताना दिसत आहे. या युवकाची ही कृती त्याच्या चांगलीच अंगलट असून, पोलिसांनी त्याच्याकडून दंडापोटी मोठी रक्कम वसूल केली आहे.

    सोशल मीडियाने संपूर्ण देश आणि जग व्यापलं आहे. व्हायरल होण्यासाठी लोक कोणत्याही थराला जात असल्याचं चित्र आहे. रातोरात प्रसिद्धी मिळवणं हे या प्रत्येकाचं उद्दिष्ट असतं. काही वेळा स्टंट्स करण्याच्या नादात त्यांना मोठ्या नुकसानालाही सामोरे जावं लागू शकतं. सध्या सोशल मीडियावर एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात एक तरुण रस्ता सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून हेल्मेटशिवाय आणि बीअर पीत मोटरसायकल चालवत असल्याचं दिसतं. अशा प्रकारची ही घटना पहिलीच नाही. यापूर्वीही वाहतुकीचे नियम तोडून मनमानी पद्धतीने वाहन चालवण्याचे प्रकार समोर आले आहेत.

    सोशल मीडियावरचा हा व्हिडिओ गाझियाबादचा आहे. या व्हिडिओत एक तरुण वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून हेल्मेट परिधान न करता मोटरसायकल चालवत असून, त्याच वेळी तो स्वतःचा व्हिडिओ शूट करताना दिसतो. तरुणाचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन गाझियाबाद पोलिसांनी या तरुणाला विविध कलमांखाली 31 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्याच्या चलनात एमव्ही कायदा 1989च्या 4 कलमांतर्गत दंड ठोठावण्यात आल्याचं दिसतं.

    यापूर्वी अशा प्रकारची एक घटना घडली होती. वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवत काही लोकांनी मनमानी केल्याचं समोर आलं होतं. मध्य प्रदेशातले कुख्यात गुन्हेगार झुबेर मौलाना याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात तो त्याच्या साथीदारांसह जीपवर उभा होता, तर त्याचे काही साथीदार वाहनाच्या आत उभे राहून जयघोष करत नाचताना दिसत होते. त्याच्या जीपसमोरची एक कार मागे जाताना दिसत होती. व्हिडिओ रेकॉर्डिंग करणारा गुंड कारमधल्यांना नाचण्यास सांगत असल्याचं व्हिडिओत ऐकायला मिळत होतं. अशाप्रकारे मनमानी करत रस्त्यावरची वाहतूक विस्कळीत करणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई केल्याचं पाहायला मिळतं.

    First published:

    Tags: Bike, Crime news