नवी दिल्ली 13 जुलै: एका मेळ्यामध्ये मोठा पाळणा खाली पडता-पडता वाचला. यामध्ये अनेक लोक बसलेले होते (Ride Goes Out of Control at National Cherry Festival). हे दृश्य पाहून तिथे उपस्थित असलेले लोक खूप घाबरले. घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral on Social Media) झाला आहे. ही घटना अमेरिकेच्या मिशिगनमधील ट्रॅवर्स सिटीच्या नॅशनल चेरी फेस्टिवलमधील (National Cherry Festival) आहे.
भरमंडपात नवरीचं धक्कादायक कृत्य; नवरदेवासह उपस्थितही हादरले, पाहा VIDEO
समोर आलेल्या वृत्तानुसार, घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून शुक्रवारी सकाळपर्यंत यातील सर्वांना बाहेर काढण्यात आलं. ट्विटर आणि रेडिटवर या घटनेचे भयंकर व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. घटनेच्या वेळी तिथे उपस्थित असलेल्या इतरांनी पाळणा तुटत असल्याचं दिसताच जमिनीत गाडलेल्या खिळ्यांना पकडलं. पाळण्यातील लोकांचा जीव वाचवण्यासाठी खाली उपस्थित असलेल्या लोकांनी रेलिंग पकडली आणि अनोकांना वाचवलं.
Bystanders at the Cherry Festival in Traverse City, Michigan rushed over to stop a carnival ride from tipping over https://t.co/OeE4sASyF6 pic.twitter.com/ulLbxgQNRB
— philip lewis (@Phil_Lewis_) July 10, 2021
This angle is much, much worse! Wow pic.twitter.com/2cEJK3h0ee
— philip lewis (@Phil_Lewis_) July 10, 2021
चाट विक्रेत्याचे अश्रू पाहून मुंबईकर भावुक; व्हायरल होताच मदतीसाठी आले अनेक हात
चेरी फेस्टिवलमधील हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी हा भीतीदायक क्षण कॅमेऱ्यात कैद केला. आतापर्यंत हा व्हिडिओ 4.5 मिलियनहून अधिकांनी पाहिला आहे. याशिवाय घटनेचा आणखी एक जवळून काढलेला व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओही आठ लाख वेळा पाहिला गेला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking video viral, Viral news