मराठी बातम्या /बातम्या /Viral /बुडणाऱ्या हंसाला वाचवण्याासठी अनेक तास चाललं बचावकार्य; जवळ जाऊन पाहताच शॉक झाली टीम

बुडणाऱ्या हंसाला वाचवण्याासठी अनेक तास चाललं बचावकार्य; जवळ जाऊन पाहताच शॉक झाली टीम

नदीमध्ये तरंगणाऱ्या या पांढऱ्या रंगाच्या प्लॅस्टिक खुर्चीवर सगळ्यात आधी जवळून जात असलेल्या एका व्यक्तीची नजर पडली. हे पाहताच त्याने लगेचच रेस्क्यू टीमला फोन केला

नदीमध्ये तरंगणाऱ्या या पांढऱ्या रंगाच्या प्लॅस्टिक खुर्चीवर सगळ्यात आधी जवळून जात असलेल्या एका व्यक्तीची नजर पडली. हे पाहताच त्याने लगेचच रेस्क्यू टीमला फोन केला

नदीमध्ये तरंगणाऱ्या या पांढऱ्या रंगाच्या प्लॅस्टिक खुर्चीवर सगळ्यात आधी जवळून जात असलेल्या एका व्यक्तीची नजर पडली. हे पाहताच त्याने लगेचच रेस्क्यू टीमला फोन केला

नवी दिल्ली 25 जानेवारी : अॅनिमल रेस्क्यू टीमचं (Animal Rescue Team) काम असतं, अडचणीत अडकलेल्या प्राण्यांची मदत करणं. एखादा प्राणी जर अडचणीत असेल किंवा एखाद्या अशा ठिकाणी अडकला असेल, जिथून त्याला स्वतःला बाहेर काढणं शक्य होत नाहीये, तेव्हा रेस्क्यू टीम मदतीसाठी पोहोचते. मात्र, अनेकदा या टीमचे काही गैरसमज होतात आणि ते अजब स्थितीमध्ये (Weird Situation) अडकतात. 2021 साल हे इंग्लंडच्या रेस्क्यू टीमसाठी अतिशय व्यग्र होतं. मागील वर्षी टीमने तब्बल 2 लाख 81 हजार 390 प्राण्यांना रेस्क्यू केलं. मात्र, यादरम्यान अशाही काही घटना घडल्या, ज्यामुळे त्यांची मस्करी केली गेली.

मेंढीशी पंगा घेणं व्यक्तीला पडलं भारी; अखेर ओढावली अशी वेळ की...; Watch Video

डोरसेट इथेही अशीच एक घटना समोर आली. इथे स्टाउट बर्स्ट नदीमध्ये लोकांना एक हंस बुडताना दिसला. हा हंस विजेच्या तारेमध्ये अडकला आहे, असं अनेकांना वाटलं. हे पाहून लगेचच अॅनिमल चॅरिटीला फोन करून बोलावण्यात आलं. त्यांनीही नदीत बुडणाऱ्या हंसाला वाचवण्यासाठी मोहिम सुरू केली. मात्र, जवळून पाहिलं असता हा हंस नसून प्लास्टिकची पांढऱ्या रंगाची खुर्ची असल्याचं लक्षात आलं.

नदीमध्ये तरंगणाऱ्या या पांढऱ्या रंगाच्या प्लॅस्टिक खुर्चीवर सगळ्यात आधी जवळून जात असलेल्या एका व्यक्तीची नजर पडली. हे पाहताच त्याने लगेचच रेस्क्यू टीमला फोन केला. टीमही लगेचच तिथे पोहोचली. पक्ष्याला वाचवण्यासाठी त्यांनी लगेचच रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. दोरी मागवली गेली आणि एक व्यक्ती नदीत उतरण्यासाठी तयारही झाला. मात्र, इतक्यात टीममध्ये एका अधिकाऱ्याने पक्षाला जवळून पाहण्यासाठी त्याचा फोटो काढला. यानंतर त्यांना समजलं की पाण्यात हंस नसून प्लॅस्टिकची खुर्ची आहे.

बापरे! काय ही अवस्था; सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्यावर प्रयोग करण्याआधी हा VIDEO पाहा

अशा अनेक घटनांचा सामना मागील वर्षी इंग्लंडच्या अॅनिमल रेस्क्यू टीमला करावा लागला. एका प्रकरणात टीमने ज्याला नाल्यात बुडणारा कुत्रा समजलं ते स्टफड खेळणं निघालं. याशिवाय एका व्यक्तीने आपल्या घरातील सोफ्यावर रेप्टाईल असल्याची माहिती दिली होती. जेव्हा रेस्क्यू टीम तिथे पोहोचली तेव्हा समजलं की इथे कोणताही साप नसून तो सोफ्याचाच एक भाग आहे. अशाच काही मजेशीर घटना टीमने स्वतः शेअर केल्या आहे.

First published:
top videos

    Tags: Rescue operation, Viral news