Home /News /viral /

VIDEO - पावसानं झोडपलं पण वऱ्हाड्यांनी लग्नाचं जेवण सोडलं नाही; खाण्यासाठी केला जबरदस्त जुगाड

VIDEO - पावसानं झोडपलं पण वऱ्हाड्यांनी लग्नाचं जेवण सोडलं नाही; खाण्यासाठी केला जबरदस्त जुगाड

भरपावसात लग्नाचं जेवण जेवण्यासाठी पाहुण्यांनी केला जबरदस्त जुगाड.

  मुंबई, 04 जुलै : पावसाळ्यात लग्न करणं म्हणजे बऱ्याच समस्यांचाही सामना करावा लागतो. अशाच एका लग्नाचा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Wedding in rain). धो धो पाऊस कोसळत असतानाही वऱ्हाड्यांनी लग्नाचं जेवण सोडलं नाही. मुसळधार पावसातही त्यांनी खुर्चीवर बसून लग्नाच्या जेवणाचा मनसोक्त आनंद लुटला आहे. त्यासाठी त्यांनी जबरदस्त जुगाड केला आहे (Eating food in wedding). लग्नात नवरा-नवरीला पाहण्याशिवाय पाहुण्यांना उत्सुकता असते ती जेवणाची. काही लोकांचं लक्ष नवरा-नवरीशिवाय जेवणाकडेच जास्त असतं. काही लोक खाण्याचे इतके शौकिन असतात की त्यांना कधीही, कुठेही आणि कोणत्याही परिस्थितीत खायला दिलं तरी ते खाऊ शकतात. याचाच प्रत्यय या व्हिडीओतून दिसत आहेत. ज्यात भरपावसात पाहुणे लग्नात जेवताना दिसले. व्हिडीओत पाहू शकता  मोकळ्या जागेवर मंडप घालण्यात आला आहे. तिथं पाहुणे जेवत आहेत. वरून धो धो पाऊस कोसळताना दिसतो आहे. आता असा पाऊस पडला की कुणीही जेवण सोडूनही पळेल. पण या वऱ्हाड्यांनी मात्र जेवणाचं ताट बिलकुल सोडलं नाही. तिथंच खुर्चीवर बसून ते जेवत होते. हे वाचा - कर्तव्य महत्त्वाचं! भर पावसात फूड डिलिव्हरीसाठी घोड्यावर निघाला मुंबईतला स्विगी बॉय, पाहा VIDEO पावसात न भिजता खाण्यासाठी त्यांनी जबरदस्त जुगाड केलेला दिसतो आहे. आपण भिजू नये आणि आपल्या ताटात पावसाचं पाणी पडू नये म्हणून त्यांनी आपल्या एका हाताने आपल्या डोक्यावर खुर्च्या धरल्या आहेत आणि आपल्या दुसऱ्या हाताने खाण्याचा आस्वाद घेत आहेत.
  सध्या राज्यात बहुतेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. पाऊस आला की नागरिकांची तारांबळ उडतो. जो तो आपण भिजू नये म्हणून धडपडताना दिसतो. पण या लग्नातील पाहुण्यांची बातच और आहे. हे वाचा - VIDEO : नदीच्या पूरामध्ये थरार, स्वत:ची पर्वा न करता वाचवला दोघांचा जीव mr_90s_kidd_ इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट कऱण्यात आला आहे. हे सर्व लोक केळीच्या पानावर खात आहे. यावरून हा व्हिडीओ केरळमधील असावा असं दिसून येतं आहे.  इतक्या पावसातही अगदी आरामात बसून जेवताना पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. तसंच त्यांनी केलेल्या जुगाडाचं कौतुक केलं आहे.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Monsoon, Rain, Viral, Viral videos

  पुढील बातम्या