• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • 'Relationship on Track'! व्हेलेंटाइन डे निमित्त हा PHOTO होतोय व्हायरल, तुम्ही काय म्हणाल?

'Relationship on Track'! व्हेलेंटाइन डे निमित्त हा PHOTO होतोय व्हायरल, तुम्ही काय म्हणाल?

व्हेलेंटाइन डे निमित्ताने शेअर होणाऱ्या या फोटोवर अनेक प्रतिक्रिया येत आहे. या फोटोला तुम्ही काय म्हणाल?

 • Share this:
  सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, याचा तुम्ही अंदाजही लावू शकत नाही. त्यात उद्या व्हेलेंटाइन डे असल्याने कपल्स उद्या काय करणार हे ठरवत असतील. अशातच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती महिलेसोबत मालगाडीच्या खाली लपून बसला आहे. हे दोघेजण रेल्वेच्या ट्रॅकवर बसले आहेत. हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. लोक हा फोटो खूप पसंत करीत आहेत. सोशल मीडियावर हा फोटो आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना त्यांनी मजेशीर कॅप्शन देखील दिलं आहे. फोटोसह त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ऑनलाइन डेटिंग. फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर हा फोटो व्हायरल होत आहे आणि या फोटोवर मजेशीर प्रतिक्रियाही येत आहेत. हे ही वाचा-पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात महत्त्वाची अपडेट; बहिणीने केला मोठा खुलासा या फोटोवर एका युजरने प्रतिक्रिया देत लिहिलं की, महत्त्वपूर्ण चर्चा...तर दुसऱ्या युजरने लिहिलं आहे...रिलेशनशीप ऑन ट्रॅक. तर आणखी एका युजरने लिहिलं की, ऑनलाइन डेटिंग फॉर पर्मनंट ऑफलाइन.
  Published by:Meenal Gangurde
  First published: